मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेला दंड ठोठावला आहे. आर्थिक फसवणुकीची प्रकरणांची माहिती देण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. बँक ऑफ इंडियाला चार कोटी आणि पंजाब नॅशनल बँकेला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, बँक ऑफ इंडियाच्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध, उच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश
अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रं जमा करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला. अमरावती […]
क्रूरतेचा कळस! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या, मग मृतदेहावर केला बलात्कार…
प्रयागराज : एका विक्षिप्त तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीची हत्या केली, त्यानंतर क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आणि तिच्या मृत शरीरावर बलात्कार केला. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यातील एका गावात ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज जिल्ह्यातील खेरी पोलिस स्टेशन परिसरातील डाबर गावात […]
महात्मा गांधींची पणती आशिष लता रामगोबिन यांना कोर्टाने सुनावली सात वर्षांची शिक्षा, फसवणूक केल्याप्रकरणी दोषी
दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथील कोर्टाने महात्मा गांधींची पणती आशिष लता रामगोबिन यांना सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने त्यांना 6.2 मिलियन रॅन्ड (आफ्रिकन चलन) म्हणजेच सुमारे ३.22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. वृत्तानुसार, 56 वर्षीय आशिष लता रामगोबिन यांच्यावर आरोप आहे की त्यांनी उद्योगपती एस.आर. महाराजांची फसवणूक केली. एसआर […]
थरकाप! झोपलेल्या तीन महिन्यांच्या बाळाचे कुत्र्याने तोडले लचके…
वॉटरफोर्ड : तीन महिन्यांची मुलगी झोपलेली असताना कुत्र्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात या निष्पाप बाळाने जीव गमावला आहे. आयर्लंड येथे वॉटरफोर्डमधील एका गावात ही घटना घडली. या भयंकर घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. द सनच्या वृत्तानुसार, वॉटरफोर्डमधील एका गावात सोमवारी ही घटना घडली. बाळ बेडरूममध्ये झोपलेलं […]
बॉलिवूडला मोठा धक्का, कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे निधन
मुंबई : बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंतच्या चित्रपटात आणि वेब शोमध्ये कलाकारांच्या कास्टिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कास्टिंग डायरेक्टर सेहर अली लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सेहर लतीफ यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि सोमवारी त्यांचे निधन झाले. सेहर लतीफ यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली […]
पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी जाहीर केली मदत
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दक्षिण भागात तीन जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मुर्शिदाबाद आणि हुगली येथे प्रत्येकी नऊ आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीज कोसळून जीव गमावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त केलं असून पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा केली […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे, केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ जून) देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. पहिली घोषणा सर्व राज्यांना आता केंद्राकडून मोफत लस दिली जाईल. आता राज्यांना यासाठी काही खर्च करावा लागणार नाही. तर दुसरी घोषणा म्हणजे, देशातील 80 कोटी गरीब लोकांना नोव्हेंबर म्हणजे दिवाळीपर्यंत मोफत रेशन दिले जाईल. पंतप्रधान मोदी […]
ब्रेकिंग : पुण्यात अग्नितांडव, पिरंगुट एमआयडीसी भागातील सॅनिटायझर उत्पादक कारखान्यात भीषण आग, 8 महिला ठार
पुणे : पुण्याच्या पिरंगुट एमआयडीसी भागातील एका सॅनिटायझर उत्पादक कारखान्यात सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली. कारखान्यात अडकलेल्या 37 पैकी 8 महिला कामगार या भीषण आगीत मरण पावल्या आहेत. अद्याप बरेच कर्मचारी बेपत्ता आहेत. कारखान्यातून निघणारे धुराचे लॉट आजूबाजूच्या परिसरात पसरत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत व […]
चीनने 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीला दिली मान्यता
बीजिंग : चीनमध्ये 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सिनोव्हॅक बायोटेकच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळाली आहे. तीन वर्षांच्या मुलांसाठी लस मंजूर करणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे. आतापर्यंत चीनमध्ये कोरोना लस फक्त 18 वर्षांवरील लोकांना दिली जात होती. अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि इतर काही देशांमध्ये 12 ते 16 वर्षे वयोगटातील किशोरवयीन […]










