5 children seriously injured due to lightning strike
देश

पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी जाहीर केली मदत

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दक्षिण भागात तीन जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मुर्शिदाबाद आणि हुगली येथे प्रत्येकी नऊ आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीज कोसळून जीव गमावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त केलं असून पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुर्शिदाबाद जिल्ह्यात वीज कोसळल्याने आणखी तीन लोक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जंगीपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोलकातासह दक्षिण बंगालच्या जिल्ह्यांमध्ये दुपारपासूनच मुसळधार पाऊस पडला. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

पंतप्रधान मोदींनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत ट्वीट केले की, “पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळल्यामुळे मृत्यू झालेल्यांच्या प्रियजनांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. आशा आहे की या घटनेत जखमी झालेले लवकर बरे होतील.”

पीएमओने ट्विट करून या घटनेत मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यात मृतांच्या कुटूंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत