bank atm if you get torn note from atm then dont worry do this
देश शेती

आनंदाची बातमी; केंद्र सरकारचा पहिला मोठा निर्णय, जूनमध्ये बँक खात्यात या तारखेला इतके पैसे जमा होणार

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी PM-KISAN योजनेच्या १७व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी सत्ता हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीला भेट देणार आहेत. यादरम्यान, ते देशभरातील ९.२६ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा PM-KISAN योजनेचा १७वा हप्ता जारी करणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांशी बोलताना कृषी क्षेत्राप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. चौहान म्हणाले, पंतप्रधान मोदींचे गेल्या दोन कार्यकाळात शेतीला नेहमीच प्राधान्य राहिले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदीजींनी सर्वप्रथम पीएम-किसान योजनेचा १७वा हप्ता जाहीर केला आणि त्यांनी त्या संबंधित फाइलवर सही देखील केली.

PM-KISAN हा २०१९ मध्ये सुरू केलेला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) उपक्रम आहे. या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. चौहान म्हणाले की, योजना सुरू केल्यापासून केंद्राने देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ३.०४ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत