double murder in pune chakan hotel owners and 5 others killed two workers
क्राईम पुणे महाराष्ट्र

धक्कादायक घटना! पत्नीच्या गळ्यावर वार करून पतीने लॉजच्या रुमला कुलूप लावले, पत्नीचा मृत्यू

पुणे : घरगुती वादातून पतीने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. खून करून पती लाॅजला कुलूप लावून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काजल कृष्णा कदम (वय २७) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. कृष्णा कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल आणि कृष्णा मजुरीचे काम करीत होते. दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. मात्र, दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला होता.या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते शनिवारी दुपारी भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लाॅजमध्ये गेले. दोघांनी तेथे मद्यपान केले. नशेमध्ये असताना दोघांमध्ये वाद झाला. कृष्णाने काजलच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केला.

या घटनेनंतर खोलीला कुलूप लावून तो फरार झाला. कृष्णानेकाही वेळाने त्याने मित्राला पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. मित्राने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लॉजमध्ये जाऊन खोलीचे कुलूप तोडले असता काजल मृत अवस्थेत आढळून आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत