आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात…
- कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर; विधेयकांचे कायद्यात रुपांतर – घटनांची या विधेयकांविरोधात आंदोलनं सुरु असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकांना आपल्या सहीसह मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे.
- अदर पूनावाला यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक.. – भारताच्या लशीचं उत्पादन आणि लशीच्या वितरणाची क्षमता संपूर्ण मानवतेला संकटातून बाहेर काढण्याच्या कामी येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत म्हटलं होतं. यावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत
- हार्ले डेविडसन कंपनीचा भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय – अमेरिकेच्या हार्ले डेविडसन या मोटारसायकलची निर्मिती करणाऱ्या कंपनीने भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मागील वर्षी ग्लोबल री-स्ट्रक्चरिंग इनिशिएटिव्हची घोषणा केली होती. त्याअंतर्गत ज्या देशात कंपनीची विक्री आणि फायदा कमी आहे, त्या देशांमधील व्यवसाय बंद करायचा होता.
- शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली – संजय निरुपम – संजय निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ” असे वाटतेय की शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली आहे
- थिएटर्स उघडणार, ममता बॅनर्जींचा निर्णय – पश्चिम बंगालमध्ये एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे
दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर थोडक्यात घडामोडीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर..




