baby girl has died after being attacked by a dog while asleep in a bedroom
ग्लोबल

थरकाप! झोपलेल्या तीन महिन्यांच्या बाळाचे कुत्र्याने तोडले लचके…

वॉटरफोर्ड : तीन महिन्यांची मुलगी झोपलेली असताना कुत्र्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात या निष्पाप बाळाने जीव गमावला आहे. आयर्लंड येथे वॉटरफोर्डमधील एका गावात ही घटना घडली. या भयंकर घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

द सनच्या वृत्तानुसार, वॉटरफोर्डमधील एका गावात सोमवारी ही घटना घडली. बाळ बेडरूममध्ये झोपलेलं होतं, त्यावेळी अचानक कुत्र्याने या बाळावर हल्ला केला. कुत्र्याने या बाळाचे लचके तोडल्याने बाळ गंभीर जखमी झाले. त्यानंतर या बाळाला तातडीने क्रोक विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथील कर्मचार्‍यांना अगोदरच घटनेची माहिती देऊन सतर्क करण्यात आले होते. परंतु, सर्व प्रयत्न करूनही या बाळाचा जीव वाचवता आला नाही आणि पहाटे ३ वाजता तिला मृत घोषित करण्यात आले.

तीन भावंडं आणि पाळीव कुत्र्याचा कालव्यात बुडून मृत्यू, एक फोन आल्याने अनर्थ घडला…

या अपघातानंतर बाळाची आई विचलित झाली असून संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. जवळचे नातेवाईक त्यांना धीर देत आहेत. बाळाचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. घटनेनंतर पोलिसांनी फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी घर सील केले असून आजूबाजूच्या लोकांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक लोकदेखील घाबरले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत