मुंबई : मुंबईत बलात्काराचा आरोपी पसार झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील कांदिवली भागात हा प्रकार घडल्यानंतर चारकोप पोलिसांनी आरोपी अविनाश यादव याचा शोध सुरु केला आहे. अँटीजन चाचणी करुन परतत असताना गाडी सिग्नलवर थांबल्यानंतर संधी साधत आरोपीने पोलिसांना धक्का दिला आणि हातकडीसह पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय अविनाश यादव असे या आरोपीचे नाव आहे. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
VIDEO : धावत्या ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात प्रवासी खाली पडला, आरपीएफ जवानाच्या तत्परतेमुळे वाचले प्राण
मुंबई : मुंबई येथे रेल्वे पोलिस दलाच्या (RPF) जवानांच्या तत्परतेमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रवासी धावत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करताना अचानक खाली पडला. खाली पडल्यानंतर ती व्यक्ती प्लॅटफॉर्म व ट्रेन यांच्या दरम्यान अडकण्याची शक्यता वाटत असतानाच आरपीएफच्या जवानाने धावत जाऊन त्या व्यक्तीला वाचवले. मध्य […]
महागाईचा भडका! गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ
मुंबई : महागाईमुळे सामान्य माणसांच्या खर्चाचे बजेट कोलमडत आहे. त्यातच पुन्हा एकदा विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता 834 रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 809 रुपये होती. दरम्यान, एप्रिलमध्ये […]
लसीकरण केंद्रावरील रांगेत उभं राहून जाणून घ्या, लोकांना काय अडचणी येतायत – पंतप्रधान नरेंद्र मोदीं
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील शंका आणि प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदींनी कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये आरोग्य मंत्रालय, नागरिक हवाई उड्डाण मंत्रालय, रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी कोरोना लसीकरणासंदर्भात सर्वच मंत्र्यांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तसेच […]
गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक
सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे. ते बैठकीसाठी सोलापुरात आले होते. सकाळीच त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी आमदार पडळकर हे शहरातील मड्डी वस्ती परिसरातील एसबीआय कॉलनी येथे आपल्या गाडीतून घोंगडी बैठकीला आले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने […]
राष्ट्रीय डॉक्टर दिन : डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे झाले शक्य
मुंबई : राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या (1 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे आहे असे सांगून डॉक्टर्समुळेच कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे शक्य झाले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सर्व डॉक्टर्सना उद्देशून दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून आपण […]
ज्युडो प्रशिक्षकाने रागात चिमुकल्याला 27 वेळा जमिनीवर आपटलं, 2 महिने कोमात राहिल्यानंतर मृत्यू
तैवान : ज्युडो प्रशिक्षकाने रागाच्या भरात 7 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मुलगा प्रशिक्षकाला मूर्ख म्हणाला होता, त्यामुळे या प्रशिक्षकाला राग अनावर झाला. त्यानंतर या प्रशिक्षकाने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या चिमुकल्याबरोबर लढायला सांगितले. या दरम्यान, प्रशिक्षकाने या चिमुकल्या मुलाला 27 वेळा जमिनीवर आपटण्यास देखील सांगितले. यामुळे चिमुकल्याला उलट्या झाल्या आणि नंतर […]
VIDEO : पॅरासेलिंग करताना एका व्यक्तीवर शार्कने केला हल्ला, पायाचा काही भाग तुटला
जॉर्डन : पॅरासेलिंग करताना जॉर्डनच्या एका ३७ वर्षीय व्यक्तीवर अचानक एका शार्कने हल्ला केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ही व्यक्ती पॅरासेलिंग करत असताना एक शार्क अचानक पाण्यातून बाहेर आला आणि त्याने या माणसाचा उजवा पाय चावून अक्षरशः तोडून घेतला. यात या व्यक्तीची अनेक हाडे मोडली असून अनेक स्नायू देखील फाटले आहेत. या हल्ल्यात त्या […]
गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य, गणेशोत्सवासाठी गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव (२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ‘ब्रेक दि चेन’च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंध पातळीबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही, असेही […]
१ जुलैपासून अनेक नियम बदलणार, आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या…
नवी दिल्ली : १ जुलैपासून देशभरात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि जीवनावर होईल. म्हणूनच आपल्याला बदलणाऱ्या नियमांची माहिती असणे महत्वाचे आहे. १ जुलैपासून IDBI आणि SBI या बँकांतून पैसे काढणे महाग होणार आहे. चला तर बदललेल्या नियमांविषयी जाणून घेऊया. SBI ने नियम बदलले 1 जुलैपासून ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी […]










