नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय देत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश दिले आहेत. मात्र, ही भरपाई किती असावी याचा निर्णय सरकारलाच घ्यायचा आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोविडशी संबंधित मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच जी प्रमाणपत्रे यापूर्वी दिली गेली आहेत ती दुरुस्त करण्यास […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
दुःखद! अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे निधन
मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी चे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मंदिरा आणि राज यांनी गेल्या वर्षीच मुलगी ताराला दत्तक घेतले होते. १९९९ मध्ये मंदिरा आणि राज यांचे लग्न झाले होते. राज यांनी सोमवारी सोशल मीडियावर मंदिरासोबतचा फोटो शेअर करत […]
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना मोठा दिलासा, उद्यापासून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात मोठी कपात
पुणे : रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात 50 रुपयांवर गेलेल्या प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर पुन्हा 10 रुपयांपर्यंत खाली येणार आहेत. 1 जुलैपासून हे दर लागू होणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने मार्चपासून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये […]
ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे बसला भीषण अपघात, 24 जखमी, चार जणांची प्रकृती चिंताजनक
झारखंड : झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात बसला भीषण अपघात झाला आहे. आज (३० जून) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राजगंज पोलिस स्टेशन परिसरात जीटी रोडवर बस अनियंत्रित झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत सुमारे 24 जण जखमी झाले असून बस ड्रायव्हरसह चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसने जीटी रोडवर उभ्या असलेल्या एका ट्रकला मागच्या बाजूने […]
क्रूरतेचा कळस! दोन महिलांनी कुत्र्याला स्कूटरला बांधून फरफटत नेलं, उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू
पंजाब : दोन महिलांनी कुत्र्याला निर्दयी पद्धतीने एका स्कूटरच्या मागे बांधून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर गंभीर जखमी झालेल्या कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्कूटर चालवणाऱ्या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबच्या पटियालामध्ये हा सगळा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या पटियाला शहराच्या सेंच्युरी एनक्लेव्ह भागामध्ये २० जून रोजी दोन […]
पत्नीने केला विचित्र हट्ट, नवऱ्याने प्रेम सिद्ध करायच्या नादात गमावले दोन्ही हात
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील शामली येथील कैराना या गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने पत्नीच्या सांगण्यावरून 11 हजाराची हाय व्होल्टेज वायर पकडली. त्यातून हा माणूस वाचला पण त्याला दोन्ही हात गमवावे लागले आणि आता पत्नीच्या कुटुंबीयांनी तिला नदीमकडे पाठवण्यास नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे सात वर्षांपूर्वी कैराना गावात राहणारा […]
पुणे शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकार कटिबध्द, अजित पवार यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबध्द असून या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महापालिका […]
म्हाडाच्या गाळेधारकांना ऑनलाईन भरता येणार सेवाशुल्क, जाणून घ्या नवीन ई-बिलींग प्रणाली बाबत…
मुंबई : म्हाडा सदनिकांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत प्रणालीची अत्यंत पारदर्शक सुरुवात करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) पारदर्शक व सुलभ प्रशासनाचा आदर्श घालून दिला आहे. आता सेवाशुल्क भरण्याकरिता ई-बिलिंग संगणकीय प्रणाली कार्यरत करून नागरिक केंद्रित प्रशासनाचे उत्तम उदाहरण दिले आहे. या सेवेमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना घरबसल्या सेवाशुल्क अदा करता येणार आहे. तसेच, अभय योजनेमध्ये […]
एका व्यक्तीने पोलिसांकडे दोन भुतांविरुध्द केली तक्रार, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली, कारण…
वडोदरा : एका व्यक्तीने पोलिसांकडे दोन भुतांविरुध्द तक्रार केली आहे. गुजरातमधील पंचमहाल येथे एक व्यक्ती रविवारी दुपारी जंबुगोडा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन भुतांविरुध्द तक्रार दाखल करून घेतली आहे. तक्रार देत असताना ही व्यक्ती भीतीने थरथर कापत होती. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार माणूस 35 वर्षांचा असून पंचमहालच्या जंबुगोडा तालुक्यातील एका खेड्यात राहतो. त्याने […]
राज ठाकरे यांचा लाडका जेम्स गेला, जेम्सच्या डोक्यावरून हात फिरवत दिला अखेरचा निरोप
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कुत्रा ‘जेम्स’चे 28 जून रोजी रात्री निधन झाले. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे हे श्वान प्रेमी असून ग्रेट डेन प्रजातीचा जेम्स अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. राज ठाकरे अनेक ठिकाणी जेम्सला सोबत घेऊन जात असायचे. राज ठाकरे […]










