मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी चे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मंदिरा आणि राज यांनी गेल्या वर्षीच मुलगी ताराला दत्तक घेतले होते. १९९९ मध्ये मंदिरा आणि राज यांचे लग्न झाले होते. राज यांनी सोमवारी सोशल मीडियावर मंदिरासोबतचा फोटो शेअर करत त्यांचा दिवस चांगला गेल्याचं सांगितलं होतं.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी राज कौशल यांच्या मृत्यूबद्दल माहिती दिली आहे. राज कौशल यांच्या कुटुंबाचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “मंदिरा बेदी यांचे पती आणि अॅड फिल्ममेकर राज कौशल यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. राज कौशल यांनी रविवारी त्यांच्या मित्रांबरोबर पार्टी केली होती. ते खूप चांगले गृहस्थ होते. ते सर्वांना कामाचे पैसे तात्काळ द्यायचे. त्यांच्या अचानक जाण्याने आम्ही सारेच धक्क्यात आहोत.”
View this post on Instagram
मंदिरा बेदीचे पती राज कौशल हे एक दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी ‘प्यार में कभी-कभी’, ‘शादी का लड्डू’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली होती. ‘अँथनी कौन है’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. याशिवाय त्यांनी ‘माय ब्रदर निखिल’ या चित्रपटांची निर्मिती देखील केली होती.




