पुणे : रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात 50 रुपयांवर गेलेल्या प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर पुन्हा 10 रुपयांपर्यंत खाली येणार आहेत. 1 जुलैपासून हे दर लागू होणार आहेत.
लॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने मार्चपासून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये केली होती. मात्र, आता रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत होऊ लागली आहे, त्यामुळे पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज या चारही स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 10 रुपये करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मनोझ झंवर यांनी दिली.




