मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे ३० जूनला पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मंदिरी बेदी आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड इंडस्ट्रीला देखील मोठा धक्का बसला. राज कौशल यांच्या निधनानंतर राज आणि मंदिराचे जवळचे मित्र असलेल्या सुलेमान मर्चेंट यांनी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
भयंकर! शेफ पाय घसरून गरम चिकन सूपच्या भांड्यात पडला आणि अनर्थ घडला…
बगदाद : एका लग्नसमारंभात जेवण बनवताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. जेवण बनवत असताना एक 25 वर्षीय शेफ पाय घसरून गरम चिकन सूपच्या भांड्यात पडला. यात तो 70 टक्के भाजला गेला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रयत्नांची पराकाष्टा करूनही डॉक्टर या व्यक्तीला वाचवू शकले नाहीत. या दुर्दैवी घटनेने अनेकांना धक्का बसला असून रेस्टॉरंट […]
मतदारयादीमध्ये फोटो नसल्यास नावे वगळण्यात येतील, मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन
मुंबई : मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाकडून आतापर्यंत फोटो नसलेले १ लाख १८ हजार मतदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. मतदारयादीमध्ये ज्या मतदारांचे फोटो आढळून येत नाही, अशा मतदारांनी आपले नाव ज्या मतदारसंघात आहे तिथे जाऊन आपले फोटो ८ जुलै २०२१ पूर्वी जमा करावीत, अन्यथा त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येतील, असे महत्त्वाचे आवाहन मुंबई शहर […]
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू
लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट ते फुडमॉल दरम्यानच्या तीव्र उतारावर ही दुर्घटना घडली. या अपघातात कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला. […]
Video : तंत्रज्ञानाची किमया! हवाई कारची यशस्वी चाचणी
ब्रातिस्लावा: उडणाऱ्या कार असाव्यात असे जगभरातील बर्याच जणांना वाटते, हे स्वप्नवत वाटत असले तरी आता हे स्वप्न कोठेतरी प्रत्यक्षात उतरणार असल्याचे दिसत आहे. नुकतीच एका फ्लाइंग कारची चाचणी घेण्यात आली असून ही कार हवेत उडत एका विमानतळावरून दुसर्या विमानतळावर देखील पोहोचली. रस्त्यावर चालण्यासोबतच हवेत उडण्याची क्षमता असलेल्या या कारने यशस्वी उड्डाण केले आणि यशस्वी प्रवास […]
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या, खिडकी फोडून घरात घुसले आरोपी…
बिहार : पाच जणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी पाच जणांनी खिडकी फोडून घरात प्रवेश केला आणि ते अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घेऊन गेले. या नराधमांनी पहिल्यांदा तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर मुलीची हत्या करून त्यांनी तिचा मृतदेह झाडीत फेकून दिला. ही घटना वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर […]
पुण्यात डॉक्टर दाम्पत्याच्या आत्महत्येने खळबळ
पुणे : पुण्यातील एका डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या वानवडी येथील आझादनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. अंकिता शेंडकर (वय 26) आणि डॉ. निखिल शेंडकर (वय 28) अशी मृत डॉक्टरांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता आणि निखिल हे दोघेही आझाद नगरमध्ये राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. अंकिताचे क्लिनिक […]
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला 30 किलो वजनाच्या साखळ्यांनी बांधले, आणि…
राजस्थान : राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मागील 3 महिन्यांपासून 30 किलो वजनाच्या साखळीने बांधून ठेवले होते. याबद्दल माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना लोखंडी साखळ्यांनी बांधलेली ही महिला आढळली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी या महिलेला लोखंडी साखळीतून मुक्त केले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
मोठी बातमी! भारताने दिलेल्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर 8 युरोपियन देशांमध्ये कोविशील्डला ग्रीन पास
नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियन (EU) मध्ये लसीच्या ग्रीन पासबाबत सध्या वाद सुरु आहे. दरम्यान, गुरुवारी युरोपमधील 8 देशांनी कोविशील्डला ग्रीन पास देऊन मान्यताप्राप्त लसींच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. याचा अर्थ या देशांमध्ये कोविशील्डचे दोन्ही डोस घेत असलेल्या भारतीयांना कोरोना नियमांमधून सूट देण्यात येईल. मीडिया रिपोर्टनुसार, मान्यता देणार्या देशांमध्ये जर्मनी, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, […]
मुंबई उच्च न्यायालयाने गुलशन कुमार हत्याप्रकरणातील आरोपीची याचिका फेटाळली
मुंबई : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी अब्दुल रौफ याची जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. कोर्टाने रौफला खून आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवले होते. त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. उच्च न्यायालयाने रौफची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि हत्येनंतर बराच काळ फरार असल्याची दखल घेत जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये माफी मिळण्यास आरोपी पात्र […]










