Aamir Khan and Kiran Rao Announce They're Getting Divorced
मनोरंजन

ब्रेकिंग : आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट

मुंबई : आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. शनिवारी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात त्यांनी सांगितले की ते त्यांचा मुलगा आझादसाठी सह-पालक म्हणून कायम राहतील. बॉलिवूड अभिनेता आमिर खानचे दुसरे लग्नही मोडले आहे. आमिर खान आणि किरण राव हे दोघे परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहे. 28 डिसेंबर […]

Maharashtra Will Be Unlocked In Five Levels Order Issued
कोरोना महाराष्ट्र सातारा

सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन, कोरोना रुग्णवाढीमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

सातारा : सातारा जिल्हा चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट झाला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चौथ्या स्तरामधील निर्बंध लागू केले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी काढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार हे निर्बंध लागू असतील. […]

Uttarakhand BJP MLA Suresh Rathore Accused of Rape by Former Party Colleague
देश राजकारण

भाजप आमदाराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

उत्तराखंड : ज्वालापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार सुरेश राठौर यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षातील माजी सहकारी कार्यकर्त्या महिलेनेच राठौर यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. आमदार सुरेश राठौर यांनी हे आरोप पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सुरेश राठौर यांच्याविरोधात कलम 156(3), 376, 504, 506 अशा अनेक कलमान्वये गुन्हा […]

Actor Pracheen Chauhan arrested for molestation charges
मनोरंजन

अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक

मुंबई : एकता कपूरच्या लोकप्रिय ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून टीव्ही जगतात पदार्पण केलेला अभिनेता प्राचीन चौहानला पोलिसांनी अटक केली आहे. प्राचीन चौहानवर तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अभिनेता प्राचीन चौहान विरोधात पीडित तरुणीने मालाड पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्राचीन विरोधात कलम ३५४, ३४२,३२३,५०२(२) अशा अनेक […]

Lic Housing Finance Introduce Lowest Home Loan Rate For Limited Period
अर्थकारण देश

गृहकर्ज घेताय? एलआयसी हाउसिंग फायनान्सकडून व्याजदरात मोठी कपात, जाणून घ्या…

मुंबई : एलआयसी हाउसिंग फायनान्सने गृहकर्ज दरात कपात करण्याबाबत घोषणा केली आहे. ५० लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदर ६.६६ टक्के करण्यात आला आहे. येत्या ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत हा विशेष गृहकर्ज दर लागू राहील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. गृहकर्जाचा हा सर्वात कमी व्याजदर असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. ‘एलआयसी हाउसिंग फायनान्स’चा ६.६६ टक्के गृहकर्ज दर हा जास्तीत […]

ajit pawar said sale of jarandeshwar sugar factory is as per mumbai high court decision
पुणे महाराष्ट्र

जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अजित पवार यांनी केले स्पष्ट

पुणे : साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने सील केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढणार अशी चर्चा आहे. मात्र, पुण्यातील पत्रकार परिषदेत सर्व आरोपांना अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की जरंडेश्वर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी माझा संबंध नाही. कारखान्याची विक्री मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली होती, त्यामध्ये कारखान्यातील संचालक मंडळाचा कोणताही […]

Yami Gautam summoned by ED in alleged money laundering case
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

यामी गौतमच्या अडचणीत वाढ, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ED ने पाठवले समन्स

मुंबई : अभिनेत्री यामी गौतम विरोधात सक्तवसूली संचलनालयाने (ED) समन्स जारी केले आहे. परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम कायद्याअंतर्गत तिची चौकशी केली जाणार आहे. ईडीला संशय आहे की यामीने काहीतरी आर्थिक गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी यामी विरोधात हे दुसरं समन्स जारी करण्यात आलं आहे. यावेळी जर ती चौकशीसाठी हजर राहिली नाही, तर तिला अटक होण्याची […]

a man got fracture in private part vertically in britain first case ever in world
ग्लोबल

एका पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फ्रॅक्चर, अशाप्रकारची पहिलीच केस बघून डॉक्टरही आश्चर्यचकित

ब्रिटन : ब्रिटनमध्ये एका व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाल्याचे एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. सेक्स दरम्यान, या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट तीन सेंटीमीटर फ्रॅक्चर झाला. आतापर्यंत अशा प्रकारच्या ज्या घटना समोर आल्या आहेत, त्यामध्ये आडवा (horizontal) फ्रॅक्चर व्हायचा, परंतु प्रायव्हेट पार्ट अनुलंब (vertical) स्थितीत फ्रॅक्चर झाल्याची ही पहिलीच घटना आहे. […]

bank atm if you get torn note from atm then dont worry do this
अर्थकारण देश

एटीएममधून फाटलेली नोट मिळाल्यास काय करावं? जाणून घ्या…

नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढल्यानंतर बर्‍याचदा आपल्याला फाटलेल्या नोटा मिळतात. जर ती नोट बाजारात चालवणे अवघड झाले आणि ती कोणीही घेत नसेल तर ती घेऊन बँकेत जावं लागतं. परंतु बर्‍याच वेळा बँकाही ती नोट स्वीकारण्यास नकार देतात. पण असे झाल्यास आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता आरबीआयने याबाबत लोकांच्या समस्या लक्षात घेऊन […]

sanjay raut
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शेवटी आम्हीच जिंकणार, त्यामुळे विरोधकांनी मोठ्या मनाने निवडणुका बिनविरोध कराव्यात – संजय राऊत

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत आम्हीच जिंकणार, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की विरोधकांनी कितीही आपटा, आमचाच उमेदवार निवडून येणार. कोणी कितीही ताणाताणी करा, आरडाओरडा करा पण आम्हीच जिंकणार यात काही शंका नाही. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकांसंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आपणच जिंकणार असल्याचा […]