Farmers should plan for sowing: Deputy Chief Minister Ajit Pawar
नाशिक महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी पेरणीचे सुक्ष्म नियोजन करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक : जिल्ह्यात खरीपाच्या अनुषंगाने 14 टक्के पेरण्या झाल्या असून गत वर्षी आजच्या दिवसाला 64 टक्के पेरण्या झाल्या होत्या. तुलनेत 50 टक्के कमी पेरण्या झाल्या असल्या तरी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करत जमीनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच पेरण्या करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी […]

‘Digital Smart Steaks’ to visually impaired children
महाराष्ट्र मुंबई

राज्यपालांच्या हस्ते दृष्टिहीन मुलांना ‘डिजिटल स्मार्ट स्टीक्स’ प्रदान

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते १५ दृष्टिहीन मुलांना विनाअडथळा चालण्यासाठी डिजिटल स्मार्ट स्टिक्स प्रदान करण्यात आल्या. राजभवन येथे शनिवारी (दि. ३) झालेल्या एका कार्यक्रमात वैष्णव संप्रदायाचे आचार्य गोस्वामी व्रज्रकुमारजी महाराज यांच्या उपस्थितीत मुलांना सेन्सर असलेल्या स्मार्ट स्टीक्स देण्यात आल्या. वल्लभ युथ ऑर्गनायझेशन, विश्व सिंधी सेवा संघम, लायन्स क्लब इंटरनॅशनल व नयन फाउंडेशन […]

ED issues third summons to former Home Minister Anil Deshmukh
महाराष्ट्र मुंबई

अनिल देशमुख यांच्या मुलाचीही होणार ईडीकडून चौकशी

मुंबई : ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत तीनवेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र देशमुख यांच्याकडून विविध कारणे पुढे केली जात आहेत. अशातच आता अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांनाही ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी वसुलीच्या गंभीर आरोपानंतर अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि […]

Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई

बेघर आणि भिकाऱ्यांनी देशासाठी काहीतरी काम करावे, राज्य त्यांना सर्व काही मोफत देऊ शकत नाही- हायकोर्ट

मुंबई : रस्त्यावर राहणाऱ्या बेघर आणि भिकाऱ्यांवरती मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने शुक्रवारी जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान म्हटले की, बेघर आणि भिकाऱ्यांनीही देशासाठी काहीतरी काम केले पाहिजे. राज्यच त्यांना सर्व काही प्रदान करू शकत नाही. जर त्यांना विनामूल्य सर्व काही दिले तर ते काहीच […]

ED issues third summons to former Home Minister Anil Deshmukh
महाराष्ट्र मुंबई

अनिल देशमुख यांनी दिलेली सर्व कारणे बाजूला सारत ED ने बजावले तिसरे समन्स

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) तिसरे समन्स बजावले आहे. देशमुख यांना ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. अनिल देशमुख या आधी दोन समन्म मिळूनही ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नव्हते. माझे वय झाले असून मला काही आजार असल्याने आपण ईडीच्या कार्यालयात येऊ शकणार नाही. […]

Pushkar Singh Dhami will be the new Chief Minister of Uttarakhand
देश राजकारण

पुष्करसिंग धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

उत्तराखंड : उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्करसिंग धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या तीरथसिंग रावत यांनी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत धामी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. तो मंजूर झाला आहे. पुष्करसिंग धामी हे उधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा सीटवरून आमदार आहेत. तीरथसिंग रावत […]

Art director Raju Sapte commits suicide
पुणे मनोरंजन महाराष्ट्र

कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी व्हिडिओतून सांगितलं कारण…

पुणे : कलादिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवून त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितलं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत आहेत, त्यामुळे आपल्या समोर आता काहीच पर्याय उरला नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. […]

apple watch fall detection feature
गॅझेट्स ग्लोबल तंत्रज्ञान

Apple वॉचच्या एका Feature मुळे वाचला 78 वर्षीय व्यक्तीचा जीव

अमेरिका : स्मार्ट वॉच हे अनेकांना अनेक दृष्टीने महत्वाचे वाटते. ते तुमच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब किती आहे?, तुमच्या किती कॅलरी बर्न झाल्या? अशी सर्वच प्रकारची माहिती देते. यापुढेही जाऊन Apple Watch च्या फिचरमुळे एका 78 वर्षीय वृद्धाचा जीव वाचल्याची एक घटना समोर आली आहे. Apple स्मार्ट वॉचच्या Fall Detection Feature मुळे अमेरिकेतल्या 78 वर्षीय माईक […]

Man sentenced to 20 years for raping 5-year-old granddaughter
कोल्हापूर महाराष्ट्र

स्वतःच्या ५ वर्षीय नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

कोल्हापूर : स्वतःच्या ५ वर्षीय नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आजोबाला २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी आरोपी नामदेव जाधव (वय ६५) याला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. बलात्कार व बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार ही सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित […]

money laundering case assets of late congress leader ahmed patel son in law actor dino morea
महाराष्ट्र मुंबई

ED ची कारवाई, दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई आणि डिनो मोरिया यांची संपत्ती जप्त

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी (2 जुलै) अभिनेता डिनो मोरिया, काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे. बँक घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत या चार जणांची संपत्ती जप्त करण्याचे सुरुवातीचे आदेश दिल्याचे ईडीने सांगितले. संपत्तीची एकूण किंमत […]