Pushkar Singh Dhami will be the new Chief Minister of Uttarakhand
देश राजकारण

पुष्करसिंग धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

उत्तराखंड : उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्करसिंग धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या तीरथसिंग रावत यांनी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत धामी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. तो मंजूर झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुष्करसिंग धामी हे उधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा सीटवरून आमदार आहेत. तीरथसिंग रावत यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने आज देहरादूनमध्ये पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. केंद्राच्या वतीने कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना बैठकीसाठी निरीक्षक बनविण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत धामी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत