LPG Price : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा जोरदार झटका बसला आहे. व्यावसायिक सिलिंडर पुन्हा एकदा महाग झाला आहे. १९ किलोच्या सिलिंडरमध्ये २५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दरवाढीचा झटका बसला आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झाला नाही. १० दिवसांपूर्वीच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. विनाअनुदानित घरगुती […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
जिओ यूझर्सना मोठा झटका! उद्यापासून रिचार्जवरील ‘ही’ ऑफर होणार बंद
मुंबई : रिलायन्स जिओ 200 रुपयांपेक्षा जास्त रिचार्जवर यूझर्सना JioMart मध्ये 20% कॅशबॅक देते. पण आता JioMart महा कॅशबॅक ऑफर कालबाह्य होणार आहे. टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार, JioMart महा कॅशबॅक ऑफर 31 मार्च 2022 पर्यंत म्हणजे आजपर्यंत वैध आहे. याचा अर्थ आज तुम्ही रिचार्ज केल्यास तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेल, परंतु उद्यापासून ही ऑफर बंद होईल. […]
पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच, 10 दिवसांत प्रतिलिटर 6.40 रुपयांची वाढ
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गुरुवारी 10 दिवसांत नवव्यांदा वाढ झाली. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली आहे. यापूर्वी बुधवारीही 80-80 पैशांची वाढ झाली होती. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 6.40 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने दिलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरातील कपातीचा फायदाही संपला आहे. नव्या […]
राज्य होणार कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त, राजेश टोपे यांनी दिली माहिती
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आता १ एप्रिलपासून कोरोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे. १ एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. पण असं असलं तरीही मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. मास्कशिवाय कोणीही बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई होईल अशीही […]
पुण्यातील कात्रज परिसरात सुमारे 20 सिलेंडरचा स्फोट
पुणे : पुण्यातील कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे परिसरात आगीचे लोट पाहायला मिळत आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 20 सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. याठिकाणी असलेल्या एका शेडमधे बेकायदा गॅस रिफिलिंग […]
आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात
रत्नागिरी : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ते आज रत्नागिरी दौऱ्यावर असून रत्नागिरीतील खारेपाटण याठिकाणी त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन गाड्यांचं मोठं नुकसान झालं असून आदित्य ठाकरे सुखरूप असल्याची माहिती आहे. कणकवलीतील खारेपाटण चेकपोस्ट येथे […]
आजेसासुचा अंत्यविधी करून घरी आल्यानंतर नातसुनेचाही मृत्यू
नाशिक : नाशिकमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आजेसासुचा अंत्यविधी करून घरी आल्यानंतर कपडे वाळत घालत असताना विजेचा शॉक लागून नातसुनेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलीस तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या देवळा तालुक्यातील सावकी गावात हा प्रकार घडला. आकांक्षा कचवे यांच्या […]
Video : अमेरिकेत बर्फवृष्टीमुळे ६० गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू
अमेरिका : अमेरिकेच्या पेन्सिलव्हेनिया भागात महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बर्फामुळे अंधुक वातावरण निर्माण झाल्याने समोरचं काहीही दिसू न शकल्यानं जवळपास ६० गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू तर २४ हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी स्चुयलकिल काउंटीमध्ये महामार्गावर हा अपघात घडला. एकमेकांवर आदळलेल्या बऱ्याचशा गाड्यांचं […]
मित्राच्या लग्नात बेधुंद होऊन नाचताना घडला अनर्थ, तरुणाचा मृत्यू
बीड : मित्राच्या लग्नातील मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वैभव रामभाऊ राऊत (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील शिंदेवाडी गावात रविवारी रात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी शिंदेवाडी गावात विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नात वधू-वर दोघेही शिंदेवाडी गावचे रहिवासी होते. नवरदेव अक्षय […]
नोकरीची सुवर्णसंधी! RBI मध्ये 303 पदांसाठी भरती प्रक्रिया, त्वरित करा अर्ज, जाणून घ्या…
RBI recruitment 2022 : भारतीय रिझर्व्ह बँकेने 303 ग्रेड बी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या RBI भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 28 मार्चपासून सक्रिय होतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार RBI ची ऑफिशियल वेबसाइट rbi.org.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण भरती अधिसूचना वाचून घ्यावी. […]









