पुणे : पुण्यातील कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे परिसरात आगीचे लोट पाहायला मिळत आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 20 सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. याठिकाणी असलेल्या एका शेडमधे बेकायदा गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली असून याच दरम्यान गॅस लिक होऊन हे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




