चतरा : झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील एका गावात अंधश्रद्धेची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका मौलानाने अल्पवयीन मुलीला भूतबाधा झाल्याचे सांगत तिला बरे करण्याच्या नावाखाली क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. भूत काढण्याच्या नावाखाली आरोपीने तरुणीला बेदम मारहाण करून तिचा चेहरा, ओठ, हात अगरबत्तीने जाळले. या भयंकर वेदना सहन न झाल्याने या मुलीचे मानसिक संतुलन बिघडले. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
गायक टॉम पार्करचे ब्रेन ट्यूमरने निधन, 33 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ख्यातनाम ब्रिटिश-आयरीश बँड ‘द वाँडेड’ मधील गायक टॉम पार्कर याचं 33 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो ब्रेन ट्यूमरशी झुंज देत होता. त्याच्यावर उपचार देखील सुरु होते. परंतु बुधवारी (३० मार्च) अखेर टॉमचे निधन झाले. टॉमच्या मृत्यूच्या बातमीला त्याची पत्नी अभिनेत्री केल्सी हार्डवीकने सोशल मीडियावर पोस्ट करत दुजोरा दिला आहे. केल्सीने तिच्या […]
नोकरीची संधी! DRDO मध्ये ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट पदांसाठी भरती, आजच करा अर्ज…
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बी.टेक ते पीएचडी केलेल्या उमेदवारांसाठी डीआरडीओमध्ये जाण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार DRDO च्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे (DRDO भर्ती 2022) एकूण 8 रिक्त जागा […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला (दि. 2 एप्रिल 2022) सकाळी अकरा वाजता होणार आहे. जवाहर बालभवन चर्नी रोड येथे होत असलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी […]
ब्रेकिंग! दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या दोन ट्रेनर विमानांची धडक, तीन पायलट ठार
दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या ट्रेनिंगदरम्यान दोन ट्रेनर विमानांची धडक झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात तीन पायलट ठार झाले असून अन्य काहीजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व शहरातील साचॉनमधील KT-1 विमान तळाजवळ दुपारी 1:35 वाजता (0435 GMT) हा अपघात झाला. येथे हवाई दलाकडून तपासणी करण्यात येत आहे. अग्निशमन अधिकार्यांचा हवाला देऊन, योनहाप वृत्तसंस्थेने […]
एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी महामंडळाला ३९ कोटी रुपये वितरित
मुंबई : एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरणासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार 39 कोटी रुपये महामंडळाला वितरित करण्यात आले असून या निधीतून एसटीच्या 300 बसगाड्यांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विद्यार्थीनींना बारावीपर्यंत शिक्षणासाठी गाव ते शाळेदरम्यान वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते, त्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा निधी वापरण्यात […]
अशासकीय अनुदानित कला शिक्षकांना विविध लाभ, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
अनुदानित कला संस्था कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली 31 अशासकीय कला संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजना, अध्यापकीय पदांना द्विस्तरीय / त्रिस्तरीय वेतन संरचना, अध्यापकांनी विनाअनुदानीत कला संस्थेमध्ये केलेली सेवा उच्च वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा […]
बैलगाडा शर्यतींमधले खटले मागे घेणार, मात्र ‘या’ असतील अटी
मुंबई : राज्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे दाखल झालेले खटले मागे घेण्यास मान्यता देण्यात आली. हे खटले मागे घेण्यासाठी खालील अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. बैलगाडी शर्यतीच्या घटनेत जीवित हानी झालेली नसावी, खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे 5 लाखापेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे, या खटल्यांवर पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या […]
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना ७व्या वेतन आयोगानुसार भत्ते लागू
मुंबई : शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयातील अध्यापक, तसेच अधिष्ठाता, सह संचालक व संचालक या संवर्गाना सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारसीनुसार 7 वा वेतन आयोगातील वेतनविषयक तरतुदी 2019 मध्ये लागू करण्यात आल्या आहेत. व्यवसायरोध भत्ता, पदव्युत्तर भत्ता, विशेष […]
२ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करणार, शिक्षण विभागाने केले नियोजन
मुंबई : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि ११ वीच्या शाळा एप्रिल महिन्यात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, आता शिक्षण संचालनालयाने २०२२ ची उन्हाळी सुटी २ मेपासून जाहीर करून नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू करण्यात याव्यात, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. […]








