Bus of passengers fell into the ditch, 22 people died
देश

ब्रेकिंग! यमुनोत्री महामार्गावर भीषण अपघात, बस दरीत कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू

उत्तराखंड : उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही बस सुमारे २०० ते २५० मीटर खोल दरीत कोसळली आहे. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफचे जवान मदतकार्यासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दामट्यापासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या नौगावच्या दिशेने झाला. […]

man murdered by accused who wants to kill his daughter in law
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : पत्नी सोबत राहत नसल्याच्या रागातून मेहुण्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे : पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नी सोबत राहत नसल्याच्या रागातून एकाने त्याच्या मेहुण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीचे नाव राहुल माने (वय 25) असून त्याने सिध्दार्थ काटकर (वय 20) याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. मिळालेल्या […]

Thackeray-government's scam Kirit Somaiya
नाशिक महाराष्ट्र राजकारण

किरीट सोमय्या यांचे ठाकरे कुटुंबियांवर आरोप, ‘या’ अनोंदणीकृत कंपनीच्या चाैकशीची केली मागणी

नाशिक : भाजप नेते किरीट सोमय्या सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले कि, ‘श्रीजी’ हाेम या प्रकल्पात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांची ८९ टक्के मालकी आहे. मात्र, ही कंपनी नोंदणीकृत नाही. त्यामुळे या कंपनीची चाैकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात आमदारांचा घाेडेबाजार सुरु असल्याची […]

Byju’s hits pause on Shah Rukh Khan ads after son Aryan Khan’s arrest
मनोरंजन

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर! शाहरुख खानला कोरोनाची लागण, कतरिना कैफसह अनेकजण कोविड पॉझिटिव्ह

शाहरुख खानला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या महिन्यात, अक्षय कुमारची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि शनिवारी कार्तिक आर्यन आणि आदित्य रॉय कपूर यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ, जी गेल्या आठवड्यात विजय सेतुपतीसोबत श्रीराम राघवनच्या मेरी ख्रिसमससाठी शूट सुरू करणार होती, तिची अलीकडेच कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह झाली. ती यामुळे […]

Innova Car Crashes Into 25 Feet Deep Ravine; Two Killed, Two Injured
कोल्हापूर महाराष्ट्र

कार दरीमध्ये कोसळून भीषण दुर्घटना, कोल्हापूरातील 2 तरुण जागीच ठार, 2 जखमी

कोल्हापूर : कार २५ फूट खोल दरीमध्ये कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोल्हापूरातील दोन तरुण जागीच ठार झाले, तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळल्याचे सांगितले जात आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हेमंत सोनार (वय २४ रा. राजारामपूरी) आणि शंतनू शिरीष कुलकर्णी (वय […]

Coffee consumption reduces risk of acute kidney injury
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

कॉफी पिल्यामुळे मूत्रपिंडाच्या तीव्र दुखापतीचा धोका होतो कमी, संशोधनातून समोर आली माहिती

अलीकडेच एका नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दिवसातून किमान एक कप कॉफी घेतल्याने तीव्र मूत्रपिंड दुखापत (AKI) होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. AKI ची व्याख्या जलद मूत्रपिंड निकामी होण्याशी संबंधित गंभीर किडनी रोग म्हणून केली जाते. किडनी इंटरनॅशनल रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की जे लोक दररोज कॉफी पितात, […]

about 7 lakh 88 thousand narcotics were seized in Yerawada area in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई, येरवडा परिसरात सुमारे 7 लाख 88 हजाराचे अंमली पदार्थ जप्त

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात एका गुन्हेगाराकुडन 7,88,350 रुपये किंमतीचा एम.डी. हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ३ जून रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-1 चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे स्टाफसह येरवडा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करत असताना येरवडा येथील पर्णकुटी पायथा दरबार बेकरी […]

Ncp Leader Nawab Malik Attack Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे उपचार आणि औषधपाणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये […]

Accident
महाराष्ट्र

भरधाव कारची ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक, एअर बॅग उघडल्याने जीवितहानी टळली…

हिंगोली : हिंगोली ते औंढा नागनाथ रस्त्यावरील दिग्रस फाट्याजवळ शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. हिंगोलीकडून औंढा नागनाथच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने त्याच दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला, मात्र कारमधील एअर बॅग उघडल्याने कारमधील चौघे सुखरूप बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, बोरजा येथील ट्रॅक्टरचालक […]

America President Joe Biden security lapse flight in no fly zone
ग्लोबल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत चूक, अज्ञात विमान पोहोचले घराजवळील नो-फ्लाय झोनमध्ये

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले आहे. प्रत्यक्षात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घराजवळ एक अज्ञात विमान आकाशात पोहोचले. हा तो भाग आहे, जो नो फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. या परिसरात विमान दिसल्यानंतर बायडन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षित स्थळी नेण्यात आले. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती दिली की, […]