मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे उपचार आणि औषधपाणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
I have tested #COVID19 positive and in home isolation.
Taking medication & treatment as per the doctor’s advice.
Those who have come in contact with me are advised to get Covid tests done.
Take care everyone !— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 5, 2022
शुक्रवारी फडणवीस लातूर दौऱ्यावर होते त्याठिकाणाहून ते सोलापुरला देखील जाणार होते. मात्र त्यांना ताप आल्यानंतर त्यांनी तो दौरा करुन मुंबईकडे परतले होते. त्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीला देवेंद्र फडणवीस कसे उपस्थित राहणार?, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे या नेत्यांचीही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.




