नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी केली, जी तुरुंगात असलेल्या कॉनमन सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. फेडरल एजन्सीने या प्रकरणात जॅकलिनचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावल्यानंतर ती ईडीच्या मुख्यालयासमोर हजर झाली. ईडीने एप्रिलमध्ये तिची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणात तिची यापूर्वीही चौकशी करण्यात आली […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ब्रेकिंग! अजित पवार यांना कोरोनाची लागण
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन केलं आहे. अजित पवार यांनी ट्विट करत सांगितलं कि, “काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी […]
ब्रेकिंग! सुप्रीम कोर्टाची विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना नोटीस, शिंदे गटाच्या याचिकेवर ११ जुलैला सुनावणी
नवी दिल्ली : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सुरू केलेली अपात्रतेची कारवाई रोखण्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अपात्रतेच्या सूचनेविरोधात शिवसेना बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राचे उपसभापती, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सचिव, केंद्र आणि इतरांना नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम निर्देशात एकनाथ […]
अग्निपथ योजनेअंतर्गत IAF कडे तीन दिवसांतच 56,960 अर्ज प्राप्त, भारतीय वायुसेनेची माहिती
नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेला (IAF) अग्निपथ भरती योजनेंतर्गत रविवारपर्यंत 56,960 अर्ज प्राप्त झाले आहेत. अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने झाल्यानंतर एका आठवड्यात शुक्रवारी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली, तेव्हापासून तीन दिवसांतच 56,960 अर्ज प्राप्त झाले. IAF ने रविवारी ट्विटरवर सांगितले कि, “56960! अग्निपथ भरती अर्ज प्रक्रियेला प्रतिसाद म्हणून भविष्यातील अग्निवीरांकडून आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची ही एकूण […]
आलिया भट्टने दिली गुड न्यूज, फोटो शेयर करत केली गरोदरपणाची घोषणा
मुंबई : आलिया भट्टने तिच्या गरोदरपणाची घोषणा रुग्णालयातून एका सुंदर फोटो शेयर करत केली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्न केले आणि आता ते लवकरच पालक होणार आहेत. आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली की, “आमचे बाळ… लवकरच येत आहे.” फोटोमध्ये आलिया हॉस्पिटलच्या बेडवर आणि रणबीर तिच्या बाजूला दिसत आहे. रणबीर आणि आलियाने १४ […]
शिवसेनेच्या वकिलांनी मांडली कायदेशीर बाजू, बंडखोरांवर उद्यापासून कारवाई सुरू होणार
मुंबई : शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी रविवारी पक्षाची कायदेशीर बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले, विधानसभेच्या उपसभापतींकडे बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. बंडखोरांच्या गटाकडे बहुमत असले तरी त्यांच्यावर कारवाई होईल. पण त्यांनी आपला गट इतर पक्षांत विलिन केला तर मात्र ही कारवाई टळण्याची शक्यता असते. त्यांनी 16 बंडखोर आमदारांवर कोणत्याही […]
भयंकर! चालत्या कारमध्ये सहा वर्षांची मुलगी आणि तिच्या आईवर सामूहिक बलात्कार
उत्तराखंड : हरिद्वार येथील रुडकी शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका सहा वर्षांच्या मुलीवर आणि तिच्या आईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पिरान कालियार येथील रहिवासी महिला आपल्या मुलीसह रात्री उशिरा कालियारहून रुडकी येथे जात असताना ही धक्कादायक घटना घडली. वाटेत या महिलेने एका कारमध्ये लिफ्ट मागितली. त्यानंतर चालत्या कारमध्ये मायलेकीवर सामूहिक बलात्कार […]
सिंहगडावरील पायवाटेवर दरड कोसळली, दुर्घटनेत ट्रेकिंग करणाऱ्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू
पुणे : सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ तटबंदीच्या खालच्या भागातील दरड पायवाटेवर कोसळली. या दुर्घटनेत दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. हेमांग गाला असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेमांग आणि त्याचे मित्र काल (२५ जून) ट्रेकिंगसाठी सकाळी सिंहगड चढण्यासाठी आले होते. येथे दाट धुके पसरलेले होते. दरम्यान अचानक दरड कोसळली. या घटनेनंतर […]
योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचे पक्षी धडकल्याने इमर्जन्सी लँडिंग
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे उड्डाणानंतर काही मिनिटांतच पोलिस लाइन्स येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. त्यांनी वाराणसी येथून लखनौसाठी उड्डाण घेतल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरला पक्षी धडकला, त्यानंतर त्यांना इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. दरम्यान, वाराणसीत असलेले मुख्यमंत्री आता रस्त्याने विमानतळावर जाणार आहेत आणि सरकारी विमानाने लखनौला परतणार आहेत. मुख्यमंत्री शनिवारी […]









