मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी नेतेही होते. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर फ्लोर टेस्टची मागणी केली. मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोवोव्हॅक्स लसीला 7-11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी DCGI ची मान्यता
पुणे : DCGI ने मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूटची कोविड-19 कोवोव्हॅक्स लस 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये काही अटींच्या अधीन प्रतिबंधित आणीबाणीच्या वापरासाठी मंजूरी दिली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सीएसडीसीओच्या कोविड-19 वरील विषय तज्ञ समितीने गेल्या आठवड्यात 7 ते 11 वयोगटातील कोवोव्हॅक्सला आपत्कालीन वापराचे अधिकार देण्याची शिफारस केल्यानंतर DCGI ची मान्यता मिळाली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया […]
डॉ प्रकाश आमटे पुन्हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे यांना कॅन्सरच्या उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी आणि कुटुंबीयांनी बाहेरील लोकांना त्यांना न भेटण्याचे आवाहन केले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात बीजे मेडिकल कॉलेजच्या पदवीदान समारंभासाठी पुण्यात येत असताना डॉ. आमटे यांना ताप व खोकल्याचा त्रास झाला. त्यांना […]
राज्यात 7231 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया, गृहविभागाची अधिसूचना जारी
मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. यामध्ये […]
ब्रेकिंग! उदयपूरमध्ये तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक
राजस्थान : उदयपूरमध्ये एका व्यक्तीच्या निर्घृण हत्येनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. या गुन्ह्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्याने दुकाने बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, पोलीस हाय अलर्टवर असून शांतता राखण्यासाठी जिल्ह्यात पुढील २४ तास इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दोन हल्लेखोरांपैकी एकाने कन्हैया लालवर धारदार शस्त्राने हल्ला केला तर दुसऱ्याने […]
कुर्ला इमारत दुर्घटनेत 14 जण ठार, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत
मुंबई : मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत दु:ख आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे काम आणि […]
मोठी बातमी! औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करावे, मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेची मागणी
मुंबई : औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करावे, अशी मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना नेते अनिल परब यांनी केली आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा होईल, अशी माहिती महाराष्ट्र मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे. औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. औरंगाबाद […]
देश हादरला! भरदिवसा गळा कापून तरुणाची निर्घृण हत्या, नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली आणि…
राजस्थान : उदयपूर शहरात मंगळवारी भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शहराच्या मध्यभागी असलेल्या मालदास स्ट्रीट परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी तरुणाचा मृतदेह एमबी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला आहे. या तरूणाने भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या बाजूने पोस्ट टाकल्याचे सांगितले जात आहे. या हत्येनंतर उदयपूरच्या व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप पसरला […]
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल
मुंबई : सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्याबद्दल एफआयआर तपासण्याची आणि नोंदणी करण्याची मागणी करणारी जनहित […]
एकनाथ शिंदे यांनी विनंती केली आणि आमदार शहाजीबापू पुन्हा म्हणाले, “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल…”
शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल…” या वाक्याची सर्वत्र चर्चा आहे. बापूंच्या या डायलॉगने गुवाहाटीमधील आमदारांमध्ये चांगलाच हशा पिकवला. एकनाथ शिंदे यांनीच शहाजीबापूंकडे तो डायलॉग ऐकवण्याची विनंती केली. मग शहाजीबापूंनी देखील “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील” हा डायलॉग ऐकवला. एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतचे सर्व आमदार आज हॉटेलच्या […]










