Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करावे, मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेची मागणी

मुंबई : औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करावे, अशी मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना नेते अनिल परब यांनी केली आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा होईल, अशी माहिती महाराष्ट्र मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. औरंगाबाद शहराचं नामकरण करुन संभाजीनगर केलं पाहिजे, असा प्रस्ताव अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. हा प्रस्ताव उद्याच्या बैठकीत मांडला जाईल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची शिवसेनेची जुनी मागणी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा गाजत आहे. आधी विकास, मग नामांतर असं म्हणत हा विषय पुढे ढकलला होता. मात्र ठाकरे सरकारवर अनिश्चिततेचे ढग घोंगावत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत