उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील काकोरी येथून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका जन्मदात्या वडिलांनी आपल्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. गेल्या सहा महिन्यांपासून हा नराधम बाप त्याच्या मुलीवर बलात्कार करत होता. जेव्हा-जेव्हा आई घराबाहेर जायची तेव्हा प्रत्येकवेळी वडिलांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मुलीच्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पत्नीशी भावनिक बंध न ठेवता तिच्या पैशाचा वापर करणे ही मानसिक क्रूरता, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
कर्नाटक : कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे की पती आपल्या पत्नीला पैशाचे साधन मानतो आणि तिच्याबद्दल भावनिक आसक्ती न ठेवता तिच्या पैशाचा वापर करत असेल तर ती मानसिक क्रूरता आहे. न्यायमूर्ती आलोक आराधे आणि जे एम खाझी यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण मुद्दा नमूद केला. खंडपीठाने एका केसच्या सुनावणीदरम्यान नमूद केले की, पत्नीने पतीच्या अयशस्वी व्यवसायावर […]
ब्रेकिंग! एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातून बाहेर राहणार
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही, तर एकनाथ शिंदे असतील. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. आज फक्त एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातून मी बाहेर राहणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. या […]
271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्टला मतदान
मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 5 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. मदान […]
बलात्काराचा प्रतिकार न करणे, हिंसाचाराच्या खुणा न दिसण्याचा अर्थ संमतीने सेक्स होत नाही, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
पाटणा : पाटणा उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निकालानुसार, जर एखाद्या महिलेला कोणत्याही दृश्यमान दुखापतीच्या खुणा नसतील किंवा लैंगिक हिंसाचाराच्या वेळी ती प्रतिकार करत नसेल तर याचा अर्थ ती संमतीने सेक्स करत होती असा होत नाही. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, जर एखादी महिला बलात्काराला विरोध करत नसेल, तर […]
उदयपूर हत्याकांडातील दोन्ही आरोपींना राजस्थान पोलिसांकडून भररस्त्यात चोप, पहा Video…
राजस्थान : राजस्थान पोलिसांनी उदयपूर हत्याकांडातील दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी या दिनही आरोपींची भररस्त्यात धुलाई केली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजस्थानचे प्रवक्ते नितीन अग्रवाल यांनी व्हिडीओ शेयर केला आहे. ते ट्विट करत म्हणाले कि, राजस्थान पोलिसांनी उदयपूर हत्याकांडातील दोन्ही मारेकऱ्यांना पकडले आहे. राजस्थान पोलिसांनी घटनास्थळी […]
आसाममधील पुरग्रस्तांना 51 लाख रुपयांची मदत, एकनाथ शिंदे गटाचा मोठा निर्णय
आसाम मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार पुढे आले आहेत. या सर्वांनी आसामच्या मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले कि, “आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय. आसाम […]
पुणे : 33 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पार्किंगच्या जागेतून वाहने काढण्यावरून झाला होता वाद
पुणे : 26 जून रोजी पुण्यातील नर्हे येथील न्यू प्यासा बारच्या बाहेर पार्किंगच्या जागेतून वाहने काढण्यावरून झालेल्या वादातून एका 33 वर्षीय तरुणावर निर्घृण हल्ला करण्यात आला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. नरेंद्र रघुनाथ खैरे असे मृत व्यक्तीचे नाव असून तो आंबेगाव बुद्रुक येथील रहिवासी आहे. निवृत्त पोलिस महानिरीक्षक रघुनाथ खैरे यांचा तो मुलगा होता. एपीआय आशिष […]
ब्रेकिंग! शिवसेना फ्लोअर टेस्टच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात, 5 वाजता होणार सुनावणी
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिकच गडद झाले आहे. दरम्यान, शिवसेनेने आपली भूमिका मांडली आहे. शिवसेना फ्लोअर टेस्टच्या आदेशाला आव्हान देणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. फ्लोअर टेस्टच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार. ते म्हणाले की, राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव […]
ठीक आहे, मी आजपासून बोलायचं थांबतो… – संजय राऊत
मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांशी समेट होण्याची आशा बाळगून उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र, एकीकडे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आमच्यावर अतिशय गलिच्छ शब्दांत टीका करतात आणि दुसरीकडे तुम्ही आम्हाला परत येण्याचे आवाहन करता, याचा अर्थ काय? असे विचारले होते. इतर शिवसेना आमदारही संजय […]










