महाराष्ट्र मुंबई राजकारण

ठीक आहे, मी आजपासून बोलायचं थांबतो… – संजय राऊत

मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांशी समेट होण्याची आशा बाळगून उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र, एकीकडे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आमच्यावर अतिशय गलिच्छ शब्दांत टीका करतात आणि दुसरीकडे तुम्ही आम्हाला परत येण्याचे आवाहन करता, याचा अर्थ काय? असे विचारले होते. इतर शिवसेना आमदारही संजय राऊत यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेवर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

संजय राऊत यांनी म्हटले की, ठीक आहे, मी आजपासून बोलायचं थांबतो. पण मी पक्षाची भूमिका आणि शिवसैनिक म्हणून कडवटपणे बोलत आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याची योजना आहे, त्याविरोधात बोलत आहे. आता याचा त्यांना त्रास होत असेल तर ठीक आहे. एकनाथ शिंदे हे माझे निकटचे सहकारी आहेत, मित्र आहेत. मी काय आहे हे त्यांना माहिती आहे आणि ते काय आहेत, हे मला माहिती आहे. आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतात, असे म्हणून चालणार नाही. हे चुकीचं आहे. आदित्य ठाकरे हे पक्षाचे नेते आहेत, शिवसैनिकांचा उद्रेक झालाय, आदित्य ठाकरे बोलणारच, असे संजय राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत पुढे म्हणाले कि, “१६ आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना बहुमत चाचणी घेणे बेकायदेशीर आहे. याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत. राज्यपालांनी जे विशेष अधिवेशन बोलावले आहे, ते कायद्याला धरून नाही. अनिल परब, अनिल देसाई आणि अरविंद सावंत आमची कायदेशीर बाजू सांभाळत आहेत. उद्या बंडखोर आमदारांना मुंबईत येऊ दे, मग बघू.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत