PM Modi announces one-day mourning on July 9 in honour of ex-Japan PM Shinzo Abe
देश

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन, उद्या भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जुलै रोजी शिंजो आबे यांच्या अकाली निधनाबद्दल भारतात एक दिवसीय दुखवटा जाहीर केला. शिंजो आबे यांच्यावर जपानच्या नारा प्रदेशात प्रचारादरम्यान गोळीबार करण्यात आला, त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान मोदींनी शिंजो आबे (वय 67) […]

Murder of a father
क्राईम देश

आजी-आजोबांनी PUBG खेळण्यापासून रोखले, संतापलेल्या तरुणाने रचला भयंकर कट आणि…

उत्तर प्रदेश : आजी-आजोबांनी PUBG खेळण्यापासून रोखल्यामुळे एका तरुणाने अतिशय धक्कादायक पाऊल उचलले. या तरुणाने आजी-आजोबांना अडकवण्यासाठी सहा वर्षांच्या निष्पाप मुलाची हत्या केली. उत्तर प्रदेशातील देवरायामधील हरखौली येथील रहिवासी गोरख यादव यांचा मुलगा संस्कार हा गावातच खाजगी शिकवणी शिक्षक नरसिंग शर्मा (60) यांच्या घरी शिकवणीसाठी जायचा. चिमुकल्याने आरडाओरड करू नये, त्यासाठी या तरुणाने त्याच्या तोंडात […]

Open gym equipment
अहिल्यानगर तब्येत पाणी महाराष्ट्र

व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेतून ‘शिबलापूर’ येथे बसवले ओपन जिम साहित्य…

संगमनेर : आजकाल जीममध्ये जाऊन भरपूर व्यायाम करणे, तेथील प्रशिक्षकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्यावर तरुणाई भर देताना दिसते. एखाद्या नायकासारखी आपलीही शरीरयष्टी असावी, असे तरुणांना नेहमीच वाटते. मात्र, प्रत्येकालाच जीममध्ये जाण्यासाठी फी भरणे शक्य नसते. त्यामुळेच आता हळूहळू खुल्या व्यायामशाळांचा अर्थात ‘ओपन जीम’चा ट्रेंड निर्माण होऊ लागला आहे. याच गोष्टीचा विचार करून माननीय नामदार बाळासाहेब […]

supreme court
महाराष्ट्र मुंबई राजकारण

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना राज्यात सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिल्याच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात आधीच प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र संकटाशी संबंधित इतर प्रकरणांसह या प्रकरणावर ११ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने […]

Former Japanese PM Shinzo Abe rushed to hospital after being shot, showing no vitals
ग्लोबल

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार, हृदयविकाराचा झटका आल्याने प्रकृती नाजूक

टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा शुक्रवारी गोळी लागल्याने मृत्यू झाला. जपानी माध्यमांनी ही माहिती दिली आहे. नारा प्रीफेक्चरमध्ये जमावाला संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेले तेव्हा ते कोमात […]

Raj Babbar was sentenced to two years by MP MLA court
देश राजकारण

राज बब्बर यांना दोन वर्षांचा तुरुंगवास, 26 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयाने सुनावली शिक्षा

लखनौ : काँग्रेस नेते राज बब्बर यांना लखनौच्या एमपी एमएलए न्यायालयाने मतदान अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 8500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. राज बब्बर यांना सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. निकाल सुनावताना राज बब्बर न्यायालयात हजर होते. २ मे १९९६ रोजी मतदान अधिकाऱ्याने वजीरगंजमध्ये […]

Thane Mahanagarpalika 66 Corporators Join Eknath Shinde Camp
ठाणे महाराष्ट्र राजकारण

मोठी बातमी! ठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात सामील

ठाणे: एकनाथ शिंदे यांनी आता ठाण्यात शिवसेनेला आणखी एक झटका दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६६ विद्यमान नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. ठाण्यातील ६६ नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला. या सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

Lalu Prasad Yadav's health deteriorated, doctors expressed concern
देश

लालू प्रसाद यादव यांच्या शरीराची हालचाल बंद, प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली : राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांना पाटण्याहून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. तेजस्वी यादव यांनी सांगितले कि, “लालू प्रसाद यादव यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी केली जाईल. त्यानंतर उपचार सुरू केले […]

Minister Eknath Shinde
महाराष्ट्र सोलापूर

आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात

सोलापूर : पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ […]

Dgca Imposes Fine Of Rs 5 Lakh On Indigo In The Case Of A Disabled Child
देश

बोंबला! आता इंडिगो फ्लाइटच्या केबिनमध्ये आढळला धूर, डीजीसीएकडून चौकशी सुरु

रायपूर-इंदूर इंडिगो फ्लाइट (A320Neo विमान) च्या केबिन क्रूने कळवले की 5 जुलै, मंगळवार रोजी लँडिंग केल्यानंतर टॅक्सी इन दरम्यान केबिनमध्ये धूर आढळून आला, याबाबत DGCA ने माहिती दिली. सर्व प्रवासी विमानातून सुखरूप खाली उतरण्यात यशस्वी झाले, अशी माहिती इंडिगोच्या प्रवक्त्याने दिली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या घटनेची चौकशी करत आहे. A320 विमान उतरल्यानंतर केबिन […]