PM Modi announces one-day mourning on July 9 in honour of ex-Japan PM Shinzo Abe
देश

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन, उद्या भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जुलै रोजी शिंजो आबे यांच्या अकाली निधनाबद्दल भारतात एक दिवसीय दुखवटा जाहीर केला. शिंजो आबे यांच्यावर जपानच्या नारा प्रदेशात प्रचारादरम्यान गोळीबार करण्यात आला, त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पंतप्रधान मोदींनी शिंजो आबे (वय 67) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि माजी जपानी पंतप्रधानांनी जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी त्यांचे जीवन कसे समर्पित केले ते सांगितले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील त्यांच्या दुःखात सहभागी झाले आणि म्हणाले, “भारताने आज एक जवळचा मित्र गमावला आहे”.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत