पुणे : पुण्यात दररोज सरासरी पाच वाहने चोरीला जातात. गेल्या सहा महिन्यांपासून पोलिस खात्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, चोरीला जाणाऱ्या वाहनांमध्ये सर्वाधिक दुचाकी आहेत. असे असूनही वाहन शोधण्याचे प्रमाण केवळ 26% आहे, जे चिंतेचे कारण आहे. आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून दरम्यान, संपूर्ण शहरात 940 मोटारगाड्या चोरीला गेल्या, परंतु त्यापैकी केवळ 250 प्रकरणांचा शोध लागला आहे. हडपसर, […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
तामिळनाडू : तामिळनाडूच्या कुड्डालोरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना 1 जुलै रोजी घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आणि गुरुवारी रात्री तीन अल्पवयीन मुलांना अटक केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी शाळेत दहावीत शिकणारी मुलगी मे महिन्यात तिच्या पालकांना न सांगता तिच्या इयत्ता बारावीतील मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला […]
मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन
लखनौ : समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे शनिवारी निधन झाले. त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता आणि त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. साधना गुप्ता या प्रतीक यादव यांच्या आई आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांच्या सासू होत्या. साधना गुप्ता यांना शुगरसह इतर अनेक आजार होते. त्यांना मेदांता रुग्णालयात […]
केदारनाथ यात्रा मुसळधार पावसामुळे स्थगित, यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला निर्णय
उत्तराखंड : सोनप्रयागपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. रूद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने उत्तराखंडमधील काही भागात मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अमरनाथजवळील शेकडो तंबू वाहून गेल्याने 16 जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. अचानक ढगफुटीमुळे […]
अमरनाथ ढगफुटीच्या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, अनेक भाविक बेपत्ता, हेल्पलाइन क्रमांक जारी
अमरनाथ : अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप 35 ते 45 भाविक बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी गुहेजळ तब्बल 10 ते 15 हजार भाविक उपस्थित होते. या ठिकाणी अडकलेल्या भाविकांना सध्या पंचतरणीला हलवण्यात आले […]
संजय राऊत यांच्याविरुद्ध शिवडी न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरुद्ध शिवडी न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध भादंवि कलम 499, 500 साठी वॉरंट जारी केले. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. […]
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे […]
अभिनेता चियान विक्रम यांना हृदयविकाराचा झटका, चेन्नईतील रुग्णालयात दाखल
चेन्नई : अभिनेता चियान विक्रम यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याची ७ जुलै रोजी अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयाने अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स शेअर केलेले नाहीत, तथापि, रुग्णालयातील सूत्रांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची पुष्टी केली. अभिनेता त्याच्या आगामी चित्रपट पोन्नियिन सेल्वनच्या टीझर लॉन्चला उपस्थित राहणार […]
महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज २०२२ ची ६.९३ टक्के दराने परतफेड
मुंबई : महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज, 2022 ची परतफेड दि. 8 ऑगस्ट 2022 रोजी 6.93 टक्के व्याज दराने करण्यात येणार आहे, असे वित्तीय सुधारणा सचिव शैला ए. यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-10.17/प्र.क्र.61/अर्थोपाय दि. 4 ऑगस्ट 2017 अनुसार 6.93 टक्के महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज 2022 अदत्त शिल्लक रकमेची […]
महाराष्ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या सदस्यांना शपथ
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या दहा सदस्यांचा शपथविधी, प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. दहा सदस्यांना शपथ नवनिर्वाचित सदस्य रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, प्रसाद लाड, उमा खापरे, आमश्या पाडवी, श्रीकांत भारतीय, सचिन अहिर यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची […]










