नवी दिल्ली : एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्र विधानसभेतील कोणत्याही आमदारावर कारवाई करू नये असे विधानसभेच्या अध्यक्षांना कळवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये. यासंदर्भात आम्ही काय ते बघून घेऊ, […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ब्रेकिंग! विजय मल्ल्याला 4 महिने तुरुंगवास आणि 2 हजार रुपये दंड, सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणात शिक्षा…
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्याला 2017 मध्ये पैशांच्या व्यवहारांबाबत खोटी माहिती दिल्याबद्दल न्यायालयाच्या अवमानाच्या खटल्यात दोषी ठरवले होते, त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. सुप्रीम कोर्टाने विजय मल्ल्याला 4 महिने तुरुंगवास आणि 2 हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत डिएगोने हस्तांतरित केलेल्या डीलचे ४० दशलक्ष डॉलर्स ४ आठवड्यात […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा
मुंबई : त्याग, समर्पणासाठी ओळखला जाणारा सण ‘बकरी ईद’ अर्थ ‘ईद-उल- अजहा’ निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बकरी ईद’ कडून प्रेरणा घेऊन समाजातील बंधुता, एकमेकांप्रति आदर, एकतेची भावना वाढीस लागावी, हीच अपेक्षा. त्याग, समर्पणातूनच सशक्त अशा समाजाची उभारणी होते, त्यासाठी आपण सर्व एकजुटीने प्रयत्न करूया, हीच मनोकामना आणि याच शुभेच्छा! […]
इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर : इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार […]
नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची सपत्नीक महापूजा!
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. महापुजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत […]
दूषित पाणी पिल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावातील विहिरींचे दूषित पाणी पिल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे 50 जणांना अतिसाराची लागण झाली. या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती […]
केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे […]
पावसाळ्यात आहाराची घ्या विशेष काळजी, आजारांपासून दूर राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
पुणे : पावसाळ्याचा ऋतू सुरु झाला आहे. हवामानातील बदलामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसाळ्यात अनेक आजारांनाही आमंत्रण मिळू शकते. पावसाळ्यात पचनाच्या समस्या अधिक सामान्य असतात, कारण चयापचय मंद होते. गॅस, आम्लपित्त, गोळा येणे, मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे, क्रॅम्पिंग, बद्धकोष्ठता, जठराची सूज आणि आतड्यांची संवेदनशीलता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मोसमी थंडीपासून, फ्लू, टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू […]
आषाढीला विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार, निवडणूक आयोगाची परवानगी
पंढरपूर : आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा ही एकनाथ शिंदेंच्या हस्तेच होणार हे निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्याला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. मात्र, राज्यात नगरपालिका निवडणूक […]
दूषित पाण्याने बाधा झालेल्यांना त्वरित उपचार द्या; मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
अमरावती : मेळघाटमध्ये दूषित पाण्यामुळे आजारी पडलेल्या नागरिकांना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास खासगी रूग्णालयात दाखल करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या […]









