Sanjay Raut's cautious reaction to Sanjay Rathore's resignation
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत यांच्याविरुद्ध शिवडी न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरुद्ध शिवडी न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध भादंवि कलम 499, 500 साठी वॉरंट जारी केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी त्यांच्यावर 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप केला आहे. शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा यांनी संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत