At least 16 dead in Amarnath cloudburst incident
देश

अमरनाथ ढगफुटीच्या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, अनेक भाविक बेपत्ता, हेल्पलाइन क्रमांक जारी

अमरनाथ : अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप 35 ते 45 भाविक बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी गुहेजळ तब्बल 10 ते 15 हजार भाविक उपस्थित होते. या ठिकाणी अडकलेल्या भाविकांना सध्या पंचतरणीला हलवण्यात आले आहे. हवाई दलातर्फे या ठिकाणी युद्ध पातळीवर मदत व बचावकार्य सुरु आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अमरनाथ गुहेपासून एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात ढगफुटी झाली होती. डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहाने भाविकांसाठी उभारलेले सुमारे 25 तंबू आणि 2 ते 3 लंगर वाहून गेले. पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. अनेक यात्रेकरू बेपत्ता आहेत.

लष्करासह अनेक यंत्रणा बचावकार्यात सहभागी 

घटनेनंतर लगेचच जम्मू-काश्मीर पोलिसांच्या टीमसह आर्मी, आयटीबीपी, सीआरपीएफ, बीएसएफ, एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले. लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात असून त्यांना छावण्यांमध्ये हलवण्यात येत आहे. जखमींना विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेल्पलाइन नंबर :

  • 0194 2313149
  • 0194 2496240
  • 9596779039
  • 9797796217
  • 01936243233
  • 01936243018
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत