मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे ८ जुलै २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार (६४ मिमी ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कोकण […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
‘स्वराज्य महोत्सवा’साठी 35 कोटी 45 लाख रुपयांचा निधी
मुंबई : “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाअंतर्गत राज्यात साजऱ्या होणाऱ्या “स्वराज्य महोत्सवा”साठी 35 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून 30 जून रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 9 ते 17 […]
केंद्राचा मोठा निर्णय, कोविड-19 बूस्टर डोस दुसऱ्या डोसनंतर 6 महिन्यांनीच मिळणार
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व प्रौढांसाठी कोविड-19 बूस्टर डोसचे अंतर सध्याच्या 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केले की लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप (NTAGI) च्या शिफारशींनंतर हा निर्णय घेतला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्राधिकरणांना लिहिलेल्या पत्रात, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी म्हटले आहे की, […]
राज्यस्तरीय कोविड टास्क फोर्सचे काम नेहमीप्रमाणे सुरू राहावे, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई : कोविड काळात स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू ठेवावे आणि कोविड परिस्थितीत शासनाला योग्य त्या सूचना देण्यात खंड पडू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा करून त्यांना यासंदर्भात सूचना केल्या आहेत. कोविड काळात स्थापन करण्यात आलेल्या […]
मोठी बातमी! ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनामा सुपूर्द केला. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच कॅबिनेट बैठकीत मुख्तार अब्बास नक्वी यांचे कौतुक केले होते. सुत्रांनी सांगितले की, देशाच्या विकासात तुमचे योगदान असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. नकवी यांचा उद्या राज्यसभा खासदार म्हणून शेवटचा […]
आणखी एक विमान दुर्घटना टळली! इंजिन निकामी झाल्याने विस्तारा विमानाचे सिंगल इंजिनसह लँडिंग
दिल्ली : विमानात बिघाड झाल्याची प्रकरणे देशात सातत्याने समोर येत आहेत. मंगळवार 5 जुलै रोजी, बँकॉक-दिल्ली विस्तारा फ्लाइट – FLT UK-122 (BKK-DEL) सिंगल इंजिनसह दिल्ली विमानतळावर उतरले. त्यानंतर हे विमान पार्किंग बेमध्ये हलवण्यात आले. या संदर्भात एटीसीला माहिती देण्यात आली आणि प्रकरण डीजीसीएलाही कळवण्यात आले. विस्ताराच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या फ्लाइट UK 122 (BKK-DEL) मध्ये […]
ब्रेकिंग! DGCA ने स्पाइसजेटला बजावली कारणे दाखवा नोटीस, स्पाइसजेटच्या विमानांत तांत्रिक बिघाडाच्या 18 दिवसांत 8 घटना
कोलकाता : स्पाइसजेटचे बोईंग ७३७ मालवाहू विमान मंगळवारी टेकऑफ झाल्यानंतर लगेचच कोलकात्याला परतले, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. हे विमान चीनमधील चोंगकिंगला जाणार होते, परंतु विमानाचे हवामान रडार हवामान दर्शवू शकत नसल्याने ते कोलकात्याला परतले. स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाडाची गेल्या १८ दिवसांत ही आठवी घटना आहे. आता DGCA ने स्पाइसजेटला विमानाच्या सुरक्षा मार्जिनच्या ऱ्हास संदर्भात […]
काही विधान करणे हा दहशतवाद नाही, पण एखाद्याचा गळा चिरणे हा दहशतवाद आहे – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी
नवी दिल्ली : केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी देशात सुरू असलेल्या नुपूर शर्मा वाद आणि कट्टरतावादावर खुलेपणाने आपले मत व्यक्त केले आहे. नक्वी म्हणाले की, उदयपूर किंवा अन्यत्र घडलेल्या घटना अजिबात मान्य नाहीत. हा मुद्दा नुपूर शर्माचा आहे असे आम्ही म्हणत नाही. नुपूर शर्मा जे बोलल्या त्याचे कोणीही समर्थन केले नाही, परंतु […]
देशात एका दिवसात आढळले कोरोनाचे 16,159 नवीन रुग्ण, कोरोना प्रकरणांत 23% वाढ
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागील दिवसाच्या तुलनेत कोरोनाची आकडेवारी वाढली आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 23% वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16 हजार 159 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनंतर आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 15 […]
ब्रेकिंग! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ, सर्वसामान्यांना महागाईचा झटका
गॅस सिलिंडरची दरवाढ : सततच्या वाढत्या महागाईच्या काळात जनतेला आणखी एक झटका बसला आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजपासून देशात 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली असून, त्यानंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे. महागाईच्या या धक्क्यानंतर आता गॅस सिलिंडर मुंबईत 1052 […]









