मुंबई : मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले 24 तासात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रेल्वेचे २५ स्पॉट आहेत जिथे पावसामुळे रेल्वे बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होवू नये यासाठी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
आता स्पाईसजेट फ्लाइटच्या विंडशील्डला गेला तडा, मुंबईत विमानाचे सुरक्षित लँडिंग
मुंबई : स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे लँडिंग करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, स्पाईसजेट विमान क्रमांक SG 3324 वर कांडलाहून मुंबईला उड्डाण करत असताना P2 बाजूच्या विंडशील्डचा बाहेरचा भाग तुटला होता. त्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. लँडिंगबाबत बोलताना, स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, “5 जुलै 2022 रोजी, स्पाइसजेट Q400 हे विमान SG 3324 (कांडला-मुंबई) चालवत […]
वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांचा अतिशय क्रूरपणे खून, घटनेचा खळबळजनक व्हिडीओ आला समोर
कर्नाटक : प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांचा अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी भरदिवसा कथितपणे त्यांच्यावर चाकूने अनेक वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. चंद्रशेखर अंगडी, ज्यांना चंद्रशेखर गुरुजी म्हणूनही ओळखले जाते, यांची मंगळवार (5 जुलै) रोजी उत्तर कर्नाटकातील हुबळी येथील एका खाजगी हॉटेलच्या आवारात भोसकून हत्या करण्यात आली. चंद्रशेखर गुरुजी हे […]
राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, आज ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
पुणे : भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील ५ दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे, प्रशासनाला कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुणे जिल्ह्यातील घाट भागात आजपासून 9 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढचे […]
पुणे : 15 वर्षीय मुलाचे खंडणीसाठी अपहरण, आरोपींना पोलिसांनी काही तासांतच ठोकल्या बेड्या
पुणे : अपहरण झालेल्या 15 वर्षीय मुलाची पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा तासात सुटका केली. 20 लाखांच्या खंडणीसाठी या मुलाचे अपहरण करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपुरीचा स्टॉल चालवणाऱ्या मुलाच्या आईच्या तक्रारीच्या आधारे, हिंजवडी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 2 जुलै रोजी रात्री मुलगा घरी परतला नाही. नंतर मुलाच्या वडिलांना […]
पुण्यात खळबळ! 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, सोशल मीडियावर झाली होती मैत्री
पुणे : पुण्यातील कात्रज भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर 15 वर्षांच्या मुलीशी मैत्री झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शाळकरी मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री केली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. नंतर […]
आषाढीच्या महापूजेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण
मुंबई : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सत्कार केला. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी […]
बच्चू कडू यांना 17 वर्षांपुर्वी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी 20 हजार रुपयांचा दंड
अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी २००५ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करताना पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. या प्रकरणात अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी सोमवारी कडू यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ५ ऑगस्ट २००५ रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत
नागपूर : राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या नागपूरकर जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून शहरात विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. मुंबई येथून आज सकाळी ते विमानाने नागपूरला 11 वाजता पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस होत्या. नागपूर […]
दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग
नवी दिल्ली : आज (५ जुलै) स्पाइसजेट बी737 विमान ऑपरेटिंग फ्लाइट SG-11 (दिल्ली – दुबई) इंडिकेटर लाईट खराब झाल्यामुळे कराचीला (पाकिस्तान) वळवण्यात आले. त्यानंतर विमान कराची येथे सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. तीन दिवसांपूर्वीच केबिनमधील धुरामुळे दिल्ली-जबलपूर स्पाईसजेटच्या विमानाचे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले […]









