नवी दिल्ली : आज (५ जुलै) स्पाइसजेट बी737 विमान ऑपरेटिंग फ्लाइट SG-11 (दिल्ली – दुबई) इंडिकेटर लाईट खराब झाल्यामुळे कराचीला (पाकिस्तान) वळवण्यात आले. त्यानंतर विमान कराची येथे सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. तीन दिवसांपूर्वीच केबिनमधील धुरामुळे दिल्ली-जबलपूर स्पाईसजेटच्या विमानाचे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.
स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “कोणतीही आणीबाणी घोषित करण्यात आली नाही आणि विमानाने सुरक्षित आणि सामान्य लँडिंग केले. विमानात कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्याचा यापूर्वी कोणताही अहवाल नव्हता. प्रवाशांना अल्पोपहार देण्यात आला आहे. एक पर्यायी विमान कराचीला पाठवले जात आहे जे प्रवाशांना दुबईला घेऊन जाईल.”
A replacement aircraft is being sent to Karachi that will take the passengers to Dubai. <<
— SpiceJet (@flyspicejet) July 5, 2022
उड्डाणादरम्यान चालक दलाने डाव्या टाकीमध्ये असामान्यपणे इंधनाचे प्रमाण कमी झाल्याचे पाहिले. त्यांनी तपासण्या केल्या तरी इंधनाचे प्रमाण कमी होत गेल्याचे त्यांना आढळले. मात्र, उड्डाणानंतरच्या तपासणीदरम्यान डाव्या मुख्य टाकीतून कोणतीही दृश्य गळती दिसून आली नाही.




