उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात चार तरुणांनी विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि विद्यार्थिनीला या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला. घटनेच्या एका आठवड्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पीडितेने आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
माहोली कोतवाली परिसरात 6 जुलै रोजी एक विद्यार्थिनी कॉलेजमधून सायकलवरून घरी परतत होती. यादरम्यान 4 गुंडांनी तिचा रास्ता अडवून तिला एका निर्जनस्थळी नेले आणि आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला. त्यानंतर तरुणीला कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तेथून पळ काढल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
दरम्यान, 8 दिवसांनी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेने कुटुंबासह जाऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा आरोपी संदीप, रिंकू, रमेश आणि अतिबल यांच्याविरुद्ध कलम ३७९/२२ कलम ३७६ डी, ३०४ आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी पथके सातत्याने छापेमारी करत आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.




