The rule of sleeping in the train has changed, check the new guidelines
देश

IRCTC ने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, जाणून घ्या…

IRCTC New Rules : जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. भारतीय रेल्वेची सहयोगी कंपनी असलेल्या IRCTC ने तिकिटांच्या बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, IRCTC ऍप आणि वेबसाइटद्वारे, तुम्हाला प्रथम तुमचे खाते व्हेरिफाय करावे लागेल, त्यानंतर तिकीट बुकिंग केले जाईल. तसेच, आता एका युजर आयडीवर एका […]

The government will work to give justice to the common, deprived and oppressed sections- Chief Minister Eknath Shinde
ठाणे महाराष्ट्र

सर्वसामान्य, वंचित, पीडित सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सरकार करेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ठाणे : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पहिल्यांदाच ठाणे शहरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह वरूणराजानेही जोरदार हजेरी लावली. ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर चेक नाका येथे जोरदार स्वागतानंतर मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे शक्तीस्थळ आणि टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे भेट देऊन आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण केली. सर्वसामान्य, शोषित, वंचित, पीडित अशा सर्व घटकांना […]

Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. वाढता पाऊस आणि […]

Petrol, diesel prices
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, लवकरच पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय

मुंबई : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. बहुमत चाचणीत शिंदे सरकार उत्तीर्ण झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. केंद्रानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता. आता राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात […]

sushant singh rajput
मनोरंजन

सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण : सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणीला जामीन मंजूर

मुंबई : बॉलीवूड अभिनेता दिवंगत सुशांत सिंग राजपूतचा माजी रूममेट सिद्धार्थ पिठाणी याला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (NDPS कायदा) अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी पिठाणीला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पिठाणीने उच्च न्यायालयात धाव […]

Devendra Fadnavis gave an answer to Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र मुंबई राजकारण

माझा बदला म्हणजे मी ‘त्यांना’ माफ केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. शिंदे सरकारच्या बाजूने एकूण 164 मते पडली तर विरोधात केवळ 99 मते पडली. दरम्यान, सोमवारी महाराष्ट्र विधान भवनात झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण केले. फडणवीस यांनी भाषणात विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी परत येईन असे एकदा […]

bus accident in kullu himachal pradesh several passengers died
देश

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये खासगी बस दरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे बसचा भीषण अपघात झाला आहे. कुल्लूच्या सैंज व्हॅलीमध्ये सोमवारी सकाळी खाजगी बस दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर 3 प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये सुमारे 15 ते 20 लोक होते, अपघातात जखमी झालेल्या ३ जणांना कुल्लू रुग्णालयात दाखल […]

Maharashtra CM Eknath Shinde wins the trust vote by a 164-99 margin
महाराष्ट्र मुंबई राजकारण

एकनाथ शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकली, 164 मतांनी केले बहुमत सिद्ध

मुंबई : आज एकनाथ शिंदे सरकारने बहुमत चाचणीच्या लढाईत बाजी मारली आहे. सभागृहात 164 मतांनी बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून शिंदे सरकारने पहिला विजय मिळवला. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडली. यात शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूने […]

Sharad Pawar
महाराष्ट्र मुंबई राजकारण

यापूर्वी असे कधीही पहिले नाही, पवारांनी लगावला राज्यपाल कोश्यारींना टोला…

मुंबई : शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता सर्वच आमदारांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. शपथविधीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. तसेच दोन्ही नेत्यांना पेढाही भरवला. या पेढा भरवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले. आता राष्ट्रवादी […]

Two bodies were found in a canal in Fursungi village
देश

गर्भपाताची गोळी खाल्ल्याने 15 वर्षीय मुलीचा मृत्यू

चेन्नई : तामिळनाडूमध्ये एका 15 वर्षीय मुलीचा गर्भपाताची गोळी खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेंगमजवळ ही घटना घडली. मुलीला गर्भवती करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. एस मुरुगन असे या व्यक्तीचे नाव असून तो 27 वर्षांचा आहे. तो मुलीचा नातेवाईक होता. ती एका सरकारी शाळेत दहावीची विद्यार्थिनी होती आणि मुरुगन ड्रायव्हर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]