Petrol, diesel prices
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, लवकरच पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय

मुंबई : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. बहुमत चाचणीत शिंदे सरकार उत्तीर्ण झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. केंद्रानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता. आता राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा देखील यावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत