गॅस सिलिंडरची दरवाढ : सततच्या वाढत्या महागाईच्या काळात जनतेला आणखी एक झटका बसला आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजपासून देशात 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली असून, त्यानंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे.
महागाईच्या या धक्क्यानंतर आता गॅस सिलिंडर मुंबईत 1052 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068 रुपयांना मिळणार आहे. 14.2 किलोच्या घरगुती व्यतिरिक्त 5 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 18 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 8.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.




