Gold will be given as a gift at a girl's wedding
अर्थकारण देश

धनत्रयोदशीला सोनं झालं इतकं स्वस्त, तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर जाणून घ्या…

मुंबई : आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी, दागिने, भांडी खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी आहे. त्याचवेळी एक आनंदाची बातमी आहे की, आज सोन्याचा भाव प्रति टोला 130 रुपयांनी खाली आला आहे. Goodreturn वेबसाइटनुसार, आज 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 5,060 रुपये आहे, जी काल 5,073 रुपये होती. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा आजचा नवीनतम दर 50,600 […]

Bus To Gorakhpur Collides With Trolley In Madhya Pradesh's Rewa, 15 Dead, 40 Injured
देश

मध्य प्रदेशात बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 15 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील रीवा येथील सुहागी टेकडीजवळ बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत यूपीतील 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. 40 जखमींपैकी 20 जणांना प्रयागराज (यूपी) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि उर्वरित रुग्णांनाही स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रवाशांनी भरलेली […]

Salman Khan down with dengue, Karan Johar takes over Bigg Boss
मनोरंजन

सलमान खानला झाला डेंग्यू, करण जोहरने घेतला बिग बॉसचा ताबा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या डेंग्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे आता सलमान खान बिग बॉस 16 मध्ये काही आठवडे दिसणार नाही. आजकाल सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगसोबत बिग बॉस 16 चा वीकेंड का वार होस्ट करायचा, पण आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते होणार नाही. सध्या तरी प्रेक्षकांना सलमान खानशिवाय वीकेंड का वार पाहावा […]

Cargo train drives through flames after crashing into fuel truck in central Mexico
ग्लोबल

बर्निंग ट्रेनचा थरार! इंधनाच्या टँकरला धडकल्यानंतर वेगाने धावणाऱ्या ट्रेनला भीषण आग, पहा Video…

मेक्सिको : मेक्सिकोतील एक व्हिडिओ समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रेन एका आगीच्या गोळ्याप्रमाणे वेगाने धावत आहे आणि ते पाहून लोकांची तारांबळ उडताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्य मेक्सिकोमध्ये एक इंधनाचा टँकर ट्रेनला धडकल्यानंतर ट्रेनला आग लागल्याची घटना घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तेलाचा टँकर एका रेल्वेमार्गाच्या ओव्हरपासवरून जात […]

Court Extends Shiv Sena MP Sanjay Raut's ED Custody Till Aug 8
महाराष्ट्र मुंबई राजकारण

संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच! न्यायालयीन कोठडीत 15 दिवसांची वाढ

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ते सध्या ईडी कोठडीत आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी १५ दिवसांनी वाढला आहे. आज झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी आपल्याला आणखी युक्तवाद करायचा आहे, असं कोर्टाला सांगितलं. त्याची नोंद घेत कोर्टाने २ […]

cbi summoned ex maharashtra minister anil deshmukh on wednesday over corruption allegations
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग! अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगातच, मुंबई न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

मुंबई : मुंबईतील न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला. विशेष न्यायाधीश एसएच ग्वालानी यांनी आज हा निकाल दिला. न्यायालयाने म्हटले कि, “सध्याच्या प्रकरणात हे स्पष्ट झाले आहे की देशाच्या कोणत्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतलेली आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

महाराष्ट्र ऍग्रीबिझनेस नेटवर्क संस्थेस अनुदान स्वरुपात निधी; राज्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ

मुंबई : महाराष्ट्र ऍग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) संस्थेस अनुदान स्वरुपात निधी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य होणार आहे. सप्टेंबर 2020 मध्ये एकूण 142.90 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढ्या रक्कमेचा आशियाई विकास बॅंक (ADB) अर्थसहाय्यित ‘महाराष्ट्र ऍग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पास मान्यता दिलेली आहे. हा […]

Mantralaya Mumbai
महाराष्ट्र

सहकारी साखर कारखान्यांना गाळप क्षमता वाढविण्यासाठी शासकीय भागभांडवल

मुंबई : सध्याच्या 1250 मे टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना 2500 मे.टन पर्यंत दररोज गाळप करणे शक्य व्हावे म्हणून त्यांना शासकीय भागभांडवल देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी येणाऱ्या 3406.96 लाख रुपयाच्या आर्थिक भारास थकीत असलेला एफआरपी पूर्ण देण्याच्या अटींच्या अधिन राहून मान्यता देण्यात आली. […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

5G तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण

मुंबई : राज्यात ५ जी तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्याकरिता भारतीय टेलीग्राफ नियमांप्रमाणे राज्याचे दूरसंचार धोरण सुसंगत असे करण्यात आले आहे. यासंदर्भातील निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे धोरण जमिनीवरून आणि जमिनीखालून टाकावयाच्या दोन्ही प्रकारच्या ऑप्टीकल फायबर केबलसाठी लागू राहतील. सक्षम प्रधिकरण नेटवर्क टाकण्यासाठी पर्यायी मार्ग सुचवू शकतील. […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

माता सुरक्षित तर घर सुरक्षित मोहिमेसाठी आता प्रत्येक जिल्ह्यांना वाहतूक, औषधांकरिता निधी

मुंबई : राज्यातील माता सुरक्षित तर घर सुरक्षित या विशेष मोहिमेत महिलांना तपासणीसाठी नेण्याकरिता तसेच औषधांसाठी प्रती जिल्हा २ कोटी रुपये निधी देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या मोहिमेला नवरात्री उत्सवापासून सुरुवात झाली असून आरोग्य तपासणीस चांगला प्रतिसाद आहे. या मोहिमेत राज्यातील अंदाजे ४ कोटी महिलांची आरोग्य तपासणी […]