indias first high speed water taxi will be launched from mumbai with a seating capacity of 200 passengers
महाराष्ट्र मुंबई

भारतातील पहिली हाय स्पीड वॉटर टॅक्सी मुंबईतून १ नोव्हेंबर पासून सुरू होणार , २०० प्रवाशांची आसन क्षमता

मुंबई : भारतातील पहिली दोनशे प्रवाशांची क्षमता असलेली हाय स्पीड वॉटर टॅक्सी आता मुंबईत सुरू होणार आहे. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ही वेसल बनवली आहे. तिचे नाव आहे ‘नयन एलेव्हन’. 1 नोव्हेंबर पासून डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल ते मांडवा दरम्यान या नवीन वॉटर टक्सीची सेवा सुरू करण्यात येणार आहे. दिवसाला 6 फेऱ्या चालवल्या जातील. लवकरच […]

remedies to get instant relief from acidity
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

अ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळविण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

पुणे : दिवाळीचे दिवस सुरु असल्यामुळे सर्वत्र फराळाची रेलचेल आहे. वेगवेगळे पदार्थ खाण्याची चांगलं असली तरी दिवाळीनिमित्त आपण नेहमीपेक्षा जास्त गोड तसेच तेलकट पदार्थ खातो, यामुळे तब्येत बिघडण्याची भीती मात्र कायम असते. अशावेळी ऍसिडिटी, जळजळ, पोटदुखी असे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे ऍसिडिटी का होते त्याविषयी आणि ती झाल्यास तात्काळ बरे वाटण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो? […]

Pune court asks women not to arrange their hair in open court since it disturbs functioning of court
पुणे महाराष्ट्र

महिला वकिल खुल्या कोर्टात केस सावरत बसल्याने न्यायालयाच्या कामकाजात अडथळा, पुणे कोर्टाची वादग्रस्त नोटीस

पुणे : पुणे जिल्हा न्यायालयाने 20 ऑक्टोबर रोजी महिला वकिलांना खुल्या कोर्टात त्यांचे केस व्यवस्थित न करण्यास सांगितले, कारण यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो. महिला वकिलांना अशा गोष्टी टाळण्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्षेप घेतल्यानंतर शनिवारी ही वादग्रस्त नोटीस मागे घेण्यात आली. “महिला वकिलांनी खुल्या कोर्टात केसांची मांडणी केल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे, […]

Various schemes benefited 3 lakh citizens and interacted with more than 5 lakh citizens
महाराष्ट्र

विविध योजनांचा 3 लाख नागरिकांना लाभ तर 5 लाखाहून अधिक नागरिकांशी संवाद

मुंबई : राज्यात दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कर्तव्यपथ’ या उपक्रमात राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने लक्षणीय कामगिरी केली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यात सामाजिक न्याय विभागाने 6 हजाराहून अधिक विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून 5 लाखांहून अधिक नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला तर त्यातील 3 लाख […]

Stray dogs
महाराष्ट्र

भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी खायला घालणाऱ्यांना दंड करा, मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना

नागपूर : भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाला तोंड देण्यासाठी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अलीकडेच अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालणाऱ्या नागरिकांना 200 रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. खंडपीठाने नमूद केले की, अधिकाऱ्यांनी उपाययोजना करूनही रस्त्यावर अशा कुत्र्यांना खायला घालणाऱ्या काही नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे नागपूर शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. अशा नागरिकांनी […]

Farmers' Diwali will be sweet as Nashik Cooperative Sugar Factory has started - Chief Minister Eknath Shinde
नाशिक महाराष्ट्र

साखर कारखान्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : सहकारी साखर कारखाने सुरु होणे शेतकरी व सभासदांसाठी आनंदाची बाब आहे. साखर कारखाने सुरु झाल्याने शेतकरी, सभासद, आजुबाजुच्या परिसरात एक समृद्धी व परिवर्तनाचे चित्र निर्माण होऊन कठीण काळातही आर्थिक आधार देत साखर कारखाने कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे निश्चितच नाशिक सहकारी साखर कारखाना सुरु झाल्याने शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी गोड झाली आहे, […]

PM Modi said - Scientists have prepared indigenous vaccine against lumpy disease in animals
महाराष्ट्र

राज्यातील 81 हजार 564 लम्पी बाधित जनावरे रोगमुक्त

मुंबई : राज्यामध्ये 21 ऑक्टोबर, 2022 अखेर 32 जिल्ह्यांमधील एकूण 2 हजार 920 गावांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव असून 1 लाख 27 हजार 597 बाधित जनावरांपैकी 81 हजार 564 जनावरे उपचाराद्वारे रोगमुक्त झाली आहेत. उर्वरित बाधित जनावरांवर उपचार सुरु असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. सिंह म्हणाले की, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 21 ऑक्टोबर, 2022 […]

Government of Maharashtra
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाच्या कर्जरोख्यांची 8.90 टक्के दराने 21 नोव्हेंबर रोजी परतफेड

मुंबई : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या कर्जरोख्यांची 8.90 टक्के दराने 21 नोव्हेंबर 2022 रोजी परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे. महाराष्ट्र शासनच्या वित्त विभागाच्या अधिसूचना क्र. एलएनएफ-11.12/प्र.क्र.18/अर्थोपाय 16 नोव्हेंबर 2012 अनुसार 8.90 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि. 20 नोव्हेंबर पर्यंत देय असलेल्या व्याजासह 21 नोव्हेंबर, 2022 […]

Election Commission Of India
महाराष्ट्र मुंबई

अंधेरी (पू) पोटनिवडणूक; मतदान यंत्र सरमिसळीकरण प्रक्रिया पूर्ण

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी (पूर्व) या मतदारसंघात ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारी मतदान प्रक्रिया नि:पक्षपणे पार पडण्याच्या दृष्टीने मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वस्तरीय कार्यवाही सुरु आहे. याचाच भाग म्हणून मतदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण असणाऱ्या मतदान यंत्रांचे ‘द्वितीय सरमिसळीकरण’ (Second Randomization) निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार केंद्रीय निरीक्षक देवेश देवल यांच्या उपस्थितीत आज […]

sudhir mungantiwar
महाराष्ट्र

डिझेल अनुदान थकबाकी वितरणाचे आदेश जारी, मच्छिमार बांधवांना दिलासा

मुंबई : मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना नावेच्या डिझेल वर देण्यात येणाऱ्या अनुदानाची थकबाकीची रक्कम वितरित करण्याचे आदेश आज शासनाने जारी केले आहेत. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील सूचना विभागाला दिल्या होत्या. मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना त्यांच्या नावेकरता लागणाऱ्या डिझेलवरील कराची प्रतिपूर्ती अनुदानस्वरूपात केली जाते. मात्र गेल्या काही काळापासून हे अनुदान थकित असल्याबद्दल काही निवेदने […]