मुंबई : राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे भागभांडवल 311 कोटी करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 21 सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी (MAHA ARC Limited) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्याप्रमाणे कंपनी निबंधकाकडे नोंदणी झाली असून या कंपनीचे भागभांडवल 111 कोटींवरुन आज 311 कोटी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 2800 बचत गट निर्माण करणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता
मुंबई : अल्पसंख्यांक महिलांच्या आर्थिक विकासासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये नवीन 2 हजार 800 बचत गटांची निर्मिती करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठीच्या 18.59 कोटी इतक्या खर्चास देखील यावेळी मान्यता देण्यात आली. राज्यातील मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्राचा जलद विकास व्हावा याकरीता विशेष कार्यक्रम […]
महाराष्ट्र शासनाच्या ३ हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी
मुंबई : महाराष्ट्र शासनाने आठ वर्षे मुदतीचे 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी केली आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे. रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या […]
माहिती तंत्रज्ञान विभागातील तज्ज्ञांची राजपत्रित पदे MPSC च्या कार्यकक्षेतून वगळण्याचा निर्णय
मुंबई : माहिती तंत्रज्ञान विभागातील तज्ज्ञांची राजपत्रित पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे नव्याने निर्माण करण्यात आलेली माहिती तंत्रज्ञान प्रशासक आज्ञावली तज्ज्ञ (गट-अ) तसेच आज्ञावली तज्ज्ञ (गट-अ), सहायक आज्ञावली तज्ज्ञ (गट-ब) अशी ३ राजपत्रित पदे आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळण्यात येतील तसेच या पदाचे सेवाप्रवेश नियम […]
96 टक्के गोवंशीय पशुधनाचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण पूर्ण
मुंबई : राज्यात खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी पशुंचे लम्पी चर्मरोग प्रतिबंध लसीकरण केले असून, ९६ टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले की, राज्यामध्ये ऑक्टोबर अखेर ३२ जिल्ह्यांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित पशुधनापैकी एकूण ७८ हजार ३४१ पशुधन उपचाराने बरे झालेले […]
रायगड जिल्ह्यातील 20 हजार कोटींच्या कागद निर्मिती उद्योगास मान्यता
मुंबई : कोविडमुळे मंदावलेला उद्योग क्षेत्राचा वेग वाढवण्यासाठी टाळेबंदीच्या काळात, राज्यातील ज्या उद्योगांना परताव्याचे दावे दाखल करता आले नाहीत, त्यांचे असे दावे मंजूर करण्याकरिता औद्योगिक प्रोत्साहन अनुदान कालावधी दोन वर्षांनी वाढविण्याचा निर्णय उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीत रायगड जिल्ह्यातील सिनारमन्स पल्प या कागद निर्मितीच्या वीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या उद्योगासह अन्य […]
ब्रेकिंग! अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले, मदत कार्यासाठी बचावपथक रवाना
अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील एका गावात हेलिकॉप्टर कोसळले आहे. शुक्रवारी हा मोठा अपघात झाला. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील सिंगिंग गावाजवळ आर्मी एव्हिएशन ALH हेलिकॉप्टर कोसळले आहे. हे ठिकाण टुटिंग मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. मदत कार्यासाठी बचावपथक पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. #IndianArmy chopper crashes in Migging Village, Upper Siang, #ArunachalPradesh. Around […]
जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये, राज्य मंत्रिमंडळाकडून अभिनंदन
मुंबई : जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले असून राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला. कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत […]
कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना […]
मंत्रिमंडळ निर्णय : भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, 75 हजार पदभरतीसंदर्भात मोठा निर्णय
मुंबई : भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ऐन दिवाळीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयाने अतिवृष्टीमूळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येणार आहे. अशी एकूण एकूण 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी आहे. भूविकास बँकेच्या […]







