Veterinarians should be treated as per improved recommendations for lumpy - Animal Husbandry Commissioner Sachindra Pratap Singh
महाराष्ट्र मुंबई

96 टक्के गोवंशीय पशुधनाचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण पूर्ण

मुंबई : राज्यात खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी पशुंचे लम्पी चर्मरोग प्रतिबंध लसीकरण केले असून, ९६ टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सिंह म्हणाले की, राज्यामध्ये ऑक्टोबर अखेर ३२ जिल्ह्यांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित पशुधनापैकी एकूण ७८ हजार ३४१ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण १ कोटी ४० लाखाच्यावर लसी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यामधून एकूण १ कोटी ३३ लाखांवरील पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

रोगाची लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच उपचार सुरू केल्यास बहुतांश पशू उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे पशुपालकांनी वेळेवर पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुचा उपचार करण्याचे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले आहे. लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग असून, राज्यातील रोगाचा आलेख घटत आहे. हा रोग कीटकांपासून पसरणारा असून, गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत