मुंबई : मुंबई उपनगरातील १६६- अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया तर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मतदानाच्या ४८ तासापूर्वी ते मतदान संपेपर्यंत तसेच […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैश्विक ओळखपत्राचे (युडीआयडी कार्ड) वितरण
मुंबई : मुंबई उपनगरातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैश्विक ओळखपत्राचे (UDID CARD) वितरण सुरु झाले आहे. दिव्यांगानी वैश्विक ओळखपत्र चेंबूर, कलेक्टर कॉलनी येथील रोचीराम टी थडानी स्कूल फॉर हिअरिंग हॅन्डीकॅप येथून या ओळखपत्राचे वितरण सुरु असल्याची माहिती मुंबई उपनगरच्या समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी दिली. वैश्विक ओळखपत्राद्वारे केंद्राच्या व राज्य सरकारच्या विविध योजना व सवलतींचा लाभ दिव्यांगांना घेता […]
एकल वापर प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई : राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांसह मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने पुढाकार […]
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गैरकारभारासंदर्भात कार्यवाही सुरु
मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गैरकारभारासंदर्भात प्राप्त तक्रारीवरुन शासनाने समिती गठित केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील कार्यवाही आणि शिफारशी शासनाने स्वीकारल्या असून पूढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. यामध्ये एमकेसीएलला विना निविदा परिक्षेसंदर्भातील काम देणे, परीक्षा विलंब, देयके अदा करणे याबाबत व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष व प्रशासकीय प्रमुख म्हणून कुलगुरु, नागपूर विद्यापीठ […]
21 ऑक्टोबर पोलीस स्मृतिदिन 2022 : पोलीस हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
पुणे : दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणुन देशभर पाळला जातो. या दिवशी संपुर्ण वर्षात आपले कर्तव्य बजावत असताना कामी आलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देऊन श्रध्दांजली वाहण्यात येते. हा दिवस पोलीस दलाला अभिमानाचा, शौर्याला मानवंदना देण्याचा, त्याचबरोबर आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या स्मृतीने मन हेलावणाराही असतो. 21 ऑक्टोबर हा दिवस […]
थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभार्थींनी आधार नोंदणी करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सामाजिक न्याय विभागासह इतर विभागांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी नागरिकांनी आधार नोंदणी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, मुंबई व माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र राज्यात आधारचा वापर वाढविण्यासाठी तसेच प्रक्रिया सुलभ […]
बहुतांश जिल्ह्यांत लम्पीबाधित जनावरांच्या संख्येत घट – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई : राज्यात गेल्या 3 -4 दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत लम्पी आजाराच्या नवीन व गंभीर प्रकरणांमध्ये घट झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये लम्पी आजाराचा राज्यातील सद्यस्थितीबाबत विस्तृत आढावा घेण्यात आला. सिंह म्हणाले की, गत आठवडाभरातील पाऊस व त्यामुळे निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे […]
मराठा समाजातील व्यक्तींना अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणार
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून 10 हजार रुपये बिनव्याजी कर्ज प्रतीदिन रु. 10 प्रमाणे परतफेडीच्या अटीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे अशी माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासोबतच मराठा आरक्षण […]
एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना सरसकट 5 हजारांची दिवाळी भेट
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट 5 हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने 45 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. या निर्णयाचा फायदा सुमारे 87 हजारांहून अधिक अधिकारी – […]
कोयना जलविद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना पदभरतीत प्राधान्य – पालकमंत्री शंभूराज देसाई
मुंबई : कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील पात्र प्रकल्पग्रस्तांचा ऊर्जा विभागाच्या तांत्रिक पदभरतीमध्ये प्राधान्याने विचार करावा. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत मंत्रालयातील दालनात बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, उपसचिव ऊर्जा सतीश […]










