मुंबई : राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना आश्वस्त केले. मेंढ्यासाठी चराई कुरण राखीव करणे व मेंढपाळांच्या अन्य समस्यांबाबत मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संजय गायकवाड, वन विभागाचे […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी देण्यात यावी – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई वितरित करण्यात यावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक ठिकाणी माणसे जखमी होतात, तसेच शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होते. वन्यजीव संवर्धन करतांना वन्यप्राणी आणि मानवी संघर्षाचा प्रश्न हा प्रमुख अडथळा ठरतो. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसान भरपाईची रक्कम […]
नाशिक येथे 200 निवासी क्षमतेचे मुलींसाठीचे वसतिगृह सुरु होणार – चंद्रकांत पाटील
नाशिक : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याचाच भाग म्हणून नाशिक येथे 200 मुलींचे वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, ‘इतर मागासवर्ग समाजातील विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शैक्षणिक सुविधा मराठा समाजातील […]
मोठी बातमी! दिवाळीच्या तोंडावर मुंबईतून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप जप्त
मुंबई : दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुप विक्रेत्यावर कारवाई केली आहे. दि. 18/10/2022 रोजी मुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागास प्राप्त माहितीच्या अनुषंगाने मस्जिद बंदर मधील मे. ऋषभ शुद्ध घी भांडार गोडाऊन, पहिला मजला, 15, श्रीनाथजी बिल्डिंग, केशवजी नाईक रोड, चिंचबंदर, मुंबई-9, येथील तीन तुपाचे अन्न नमुने विश्लेषनासाठी […]
तळेगाव औद्योगिक क्षेत्रात त्वरित ट्रक टर्मिनलची सुविधा करा, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश
पुणे : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा क्रमांक १ साठी येत्या १५ दिवसात वाहन तळाची (ट्रक टर्मिनल) सुविधा करण्यात यावी, असे निर्देश सामंत यांनी यावेळी दिले. बैठकीला एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारोग मुकादम, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, […]
चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्याला प्राधान्य
पुणे : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत कोर्टयार्ड मेरियेट येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक आणि विद्युत समस्या सोडविण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारोग मुकादम, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी […]
मनरेगा आणि राज्य शासनाच्या योजनांच्या समन्वयातून ग्रामसमृद्धी साध्य करणार – संदिपान भुमरे
मुंबई : राज्यात मनरेगा आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या समन्वयातून आणि विविध यंत्रणांच्या मदतीने ‘वंचितता निर्मूलन मिशन’ आणि ग्राम समृद्धी साध्य करण्यात येणार असल्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. रोजगार हमी योजनेविषयी आयोजित विविध उपक्रमांच्या मंत्रालयात आयोजित सादरीकरणाच्या वेळी मंत्री श्री. भुमरे बोलत होते. यावेळी रोजगार हमी योजनेचे अपर मुख्य […]
अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या काँग्रेस अध्यक्ष म्हणून नवीन जबाबदारीसाठी खर्गे यांना शुभेच्छा
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केल्यानंतर काही तासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्गे यांना काँग्रेस अध्यक्ष म्हणून नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले कि, “श्री मल्लिकार्जुन खर्गे जी यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी माझ्या शुभेच्छा. त्यांचा पुढील कार्यकाळ फलदायी […]
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक शांत आणि निष्पक्ष वातावरणात होणार
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६-अंधेरी पूर्व’ मतदारसंघाची पोटनिवडणूक ही दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या कालावधीदरम्यान पूर्ण शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडेल; असा विश्वास मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी व्यक्त केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी शासनाने पूर्ण तयारी केली असून अंधेरी पूर्व या मतदारसंघातील […]










