मुंबई : दहशतवादी कृत्ये हे वाईटच आहेत. दहशतवादाशी लढा देणे ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच. ई. अँटोनियो गुटेरेस यांनी केले. त्यांनी आज हॉटेल ताज येथे भेट देऊन 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. या निमित्ताने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला त्यांनी भेट दिल्यानंतर उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड, 9385 पैकी मिळाली 7897 मते
नवी दिल्ली : काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाली असून, त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. सकाळी 10 नंतर सुरू झालेली मतमोजणी दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. एआयसीसीच्या मुख्यालयात मतमोजणी झाली. काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी सहाव्यांदा निवडणूक होत […]
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम
मुंबई : दिवाळी सण जवळ आला असून अन्नपदार्थ, मिठाई, विविध मसाले, तेल, तूप यासह अनेक खाद्यपदार्थ खरेदीसाठी नागरिकांची दुकानात गर्दी होत असते. तसेच अनेक नागरिकांकडून या पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारीही येत असतात. या तक्रारींची दखल घेत अशा उत्पादक, वितरण व विक्रेते यांची सखोल तपासणी करण्यासह संशयास्पद आणि तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या अन्न पदार्थ आणि औषधांचे […]
भयंकर! महिलेवर सामूहिक बलात्कार करून गुप्तांगात रॉड घुसवला, महिलेची रुग्णालयात मृत्यूशी झुंज
उत्तर प्रदेश : एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात दिल्लीतील एका ३८ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार करून अत्याचार केले. सध्या ही महिला दिल्लीतील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ती रस्त्यावर एका पोत्यात हातपाय बांधलेल्या स्थितीत सापडली होती. पीडित […]
ग्रामीण उद्योजकांच्या वस्तूंची विक्री मंत्रालयाच्या प्रांगणात
मुंबई : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील दालनांना उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी भेट दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्यावतीने 18 ऑक्टोबर ते 21 […]
विलंबाने जीएसटी भरणाऱ्या करदात्यांवर कठोर कारवाई, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची माहिती
मुंबई : वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 अंतर्गत नोंदणीकृत करदात्याने जीएसटी विवरणपत्राद्वारे सरकारी तिजोरीत जमा करणे अनिवार्य असताना अनेक करदाते विलंबाने जीएसटी भरतात. यामुळे करचोरी व गैरमार्गांना वाव मिळत असल्याने अशा करदात्यांवर कार्यवाही केली जाणार असल्याचे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जीएसटी विवरणपत्र भरण्याची प्रक्रीया सोपी असून देखील अनेक […]
दीड महिन्यात 1 कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने १ कोटी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद राज्य शासनाला मिळाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी […]
साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे, मुख्यमंत्र्यांची पत्राद्धारे पंतप्रधानांना विनंती
मुंबई : साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे. आपल्या पत्रात […]
दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस संच रेशनिंग दुकानांवर 19 व 20 ऑक्टोंबरपर्यंत उपलब्ध होणार
मुंबई : राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी गोड जावी आणि शिधावाटप दुकानांवर धान्य घेणाऱ्या लाखो नागरिकांना दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर या वस्तू जनसामान्यांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचविण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. १९ व २० ऑक्टोंबरपर्यंत या चारही वस्तू जिल्हापातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहोचविण्यात येतील व त्यानंतर या वस्तूंचे […]
‘ते संबंध सहमतीने’, बलात्काराच्या आरोपीला पीडितेशी लग्न करण्याच्या अटीवर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बलात्काराच्या खटल्यातील एका आरोपीला या अटीवर जामीन मंजूर केला की पीडित महिला जर एक वर्षाच्या आत सापडली तर त्याने तिच्याशी लग्न करावे. सध्या ही पीडित महिला बेपत्ता आहे. आरोपीने या वर्षाच्या सुरुवातीला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला आश्वासन दिले की तो पीडितेशी विवाह करण्यास आणि मुलाचे पितृत्व स्वीकारण्यास तयार आहे. दरम्यान, […]










