Chandrakant Patil
नाशिक महाराष्ट्र

नाशिक येथे 200 निवासी क्षमतेचे मुलींसाठीचे वसतिगृह सुरु होणार – चंद्रकांत पाटील

नाशिक : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याचाच भाग म्हणून नाशिक येथे 200 मुलींचे वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पाटील म्हणाले, ‘इतर मागासवर्ग समाजातील विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शैक्षणिक सुविधा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळाव्यात, अशी शासनाची भूमिका आहे. नाशिक येथे सुरू करण्यात येणाऱ्या वसतिगृहात सारथी व महाज्योती या महामंडळाच्या त्यांच्या लक्षीत गटातील प्रत्येकी 75 मुलींना प्रवेश देण्यात येणार असून उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील 50 मुलींना प्रवेश असे 200 मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण जनशताब्दी महोत्सव योजनेअंतर्गत नाशिक येथे बांधण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठीच्या वसतिगृहात सारथी व महाज्योती या महामंडळाच्या विद्यार्थिनींना प्रवेश देऊन वसतिगृहाच्या दैनंदिन कामकाजावर सारथी व महाज्योती महामंडळाचे नियंत्रण असेल आणि वसतिगृहाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च सारथी महामंडळ करेल, असेही पाटील यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत