Action initiated on the complaint received regarding the mismanagement of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University
नागपूर महाराष्ट्र

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गैरकारभारासंदर्भात कार्यवाही सुरु

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गैरकारभारासंदर्भात प्राप्त तक्रारीवरुन शासनाने समिती गठित केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील कार्यवाही आणि शिफारशी शासनाने स्वीकारल्या असून पूढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यामध्ये एमकेसीएलला विना निविदा परिक्षेसंदर्भातील काम देणे, परीक्षा विलंब, देयके अदा करणे याबाबत व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष व प्रशासकीय प्रमुख म्हणून कुलगुरु, नागपूर विद्यापीठ यांची मुख्य जबाबदारी असल्याने या मुद्याच्या कार्यवाहीबाबत आठ दिवसांत कुलगुरु नागपूर यांनी खुलासा सादर करावा, असे शासनाने कुलगुरु नागपूर यांना कळविले आहे. तसेच विद्यापीठातील विना निविदा काम देण्यात आले. या वित्तीय अनियमिततेबाबत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, विद्यापीठ अधिनियम लेखा संहितेनुसार अधिकची चौकशी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत