आयटी अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया, सासू आणि मेहुण्याला अटक केली आहे. अतुल यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये या तिघांवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या, पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत. अतुल सुभाष यांचे भाऊ, विकास मोदी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आणि सांगितले […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मंत्रिमंडळ विस्तार: नव्या मंत्र्यांचा शपथविधी, ‘या’ दिग्गज नेत्यांचा पत्ता कट
नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ५ डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपच्या १९ मंत्र्यांनी, शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत […]
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित उस्ताद झाकीर हुसेन यांचे ७३ व्या वर्षी निधन झाले. ते सध्या सॅन फ्रान्सिस्कोमधील एक वैद्यकीय संस्थेत उपचार घेत होते आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील उस्ताद अल्लाह राखा […]
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी आमच्यासोबतच नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेशीही विश्वासघात केला – अमित शाह
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या विजयानंतर राज्यात स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज (रविवारी) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विस्तार होणार आहे. परंतु, किती मंत्र्यांचा शपथविधी होणार आणि घटक पक्षांना किती मंत्रीपदे […]
पुणे : 12 वर्षांची मुलगी गर्भवती, अल्पवयीन मुलाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पुणे : एक 12 वर्षांची मुलगी गरोदर असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलीला प्रेमसंबंधाचे प्रलोभन दाखवत शारीरिक जवळीक साधली. त्यातून ही 12 वर्षांची मुलगी आता गरोदर असल्याचे समजल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलाविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडितेच्या आईने मंगळवारी (10 […]
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक या विधेयकाला मोदी सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. आता सरकार हे विधेयक सभागृहात मांडू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हे विधेयक पुढील आठवड्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आणले जाण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम जेपीसी समिती स्थापन करून सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जातील. शेवटी हे विधेयक संसदेत आणले जाईल आणि […]
साई भक्तांसाठी आनंदाची बातमी – शिर्डी साई मंदिरात हार, फुले आणि प्रसाद विक्रीला परवानगी
शिर्डी – उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून शिर्डीच्या साईबाबा मंदिरात हार, फुले आणि प्रसाद विक्रीला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. राहाता तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षे फुले विक्रीसाठी लढा दिला होता, आणि अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. फुलशेती हे या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. परंतु, साई मंदिरात फुले आणि हार विक्रीवर घालण्यात […]
पत्नीच्या छळाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या, प्रचंड मानसिक त्रास आणि 3 कोटी रुपयांची मागणी, अखेर…
बेंगळुरू : बेंगळुरू येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या यूपीतील अतुल सुभाष नावाच्या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. याप्रकरणी त्यांनी 24 पानी सुसाईड नोट देखील मागे ठेवली आहे, ज्यामध्ये त्यांनी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर त्याचा छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आरोप केला […]
कुर्ला बस अपघातात सात जणांचा मृत्यू, बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, फॉरेंसिक टीमकडून बसची तपासणी
मुंबई : मुंबईतील कुर्ला येथे लाल बहादूर शास्त्री रोडवर झालेल्या भीषण अपघातात सोमवारी रात्री बेस्ट बस चालकाने मार्केटमधील अनेक लोकांना बसखाली चिरडलं. या अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली असून या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पोलीस सर्व तपास करत असून आरटीओचे पथक […]
दुचाकी पुलावर उभी करून तरुणाची थेट नदीपात्रात उडी, लोक आवाज देत राहिले, पण…
चंद्रपूर : चंद्रपुरात एका तरुणाने नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नदी पुलावर अनेकजण उभे होते, परंतु, कोणाला काही समजण्याच्या आतच या तरुणाने नदीत उडी घेतल्यामुळे कोणाला काहीही करता आले नाही. सध्या या तरुणाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. ही घटना वर्धा नदीच्या बेलोरा पुलावर सोमवारी (९ डिसेंबर) दुपारी घडली आहे. मिळालेल्या […]










