पुणे महाराष्ट्र

पुणे : 12 वर्षांची मुलगी गर्भवती, अल्पवयीन मुलाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पुणे : एक 12 वर्षांची मुलगी गरोदर असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलीला प्रेमसंबंधाचे प्रलोभन दाखवत शारीरिक जवळीक साधली. त्यातून ही 12 वर्षांची मुलगी आता गरोदर असल्याचे समजल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलाविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पीडितेच्या आईने मंगळवारी (10 डिसेंबर) लोणीकंद पोलिस ठाण्यात 17 वर्षीय मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांच्या अहवालानुसार, ही घटना ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 दरम्यान घडली, ज्या दरम्यान अल्पवयीन मुलाने या मुलीला प्रेमाचे आमिष दाखवले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने तिच्या आईला सर्व प्रकार सांगितला, त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत