नवी दिल्ली : पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल याला अपेंडिसिटिसचा त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे.
पंजाब किंग्जच्या संघाने निवेदनात म्हटले की, केएल राहुलने पोटात दुखत असल्याची तक्रार केली होती. त्याला औषधे घेतल्यानंतर देखील बरं न वाटल्यामुळे त्याला तात्काळ इमर्जन्सी रूम मध्ये नेऊन काही चाचण्या करण्यात आल्या. त्यात राहुलला अपेंडिसिटिसचा त्रास होत असल्याचे निदान झाले. यासाठी राहुलवर शस्त्रक्रियेची गरज आहे. सुरक्षेसाठी म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Praying for KL Rahul’s health and speedy recovery ?❤️#SaddaPunjab #PunjabKings #IPL2021 pic.twitter.com/q81OtUz297
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 2, 2021
आज (रविवारी) थोड्याच वेळात पंजाब किंग्जची लढत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. ही लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून राहुलच्या गैरहजेरीत मयांक अग्रवालकडे संघाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे.




