मुंबई : देशात कोरोनामुळे कित्येकांना आपले जीव गमवावे लागत आहेत आणि केंद्र सरकार आरोग्य सुविधा पुरवण्यास अयशस्वी ठरत आहे. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे तर कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीत. या सगळ्या परिस्थितीसाठी बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार मानलं आहे. त्यांनी त्यासंदर्भात एक ट्विट करत देशाच्या गंभीर परिस्थितीवर भाष्य केलं आहे आणि मोदींवर घणाघाती टीका केली आहे.
राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत म्हटलं की, २०१४ साली सोनिया गांधी नरेंद्र मोदी यांना मौत का सौदागर म्हटल्या होत्या…! मला माहित नव्हतं की त्या एवढं चांगलं भविष्य सांगू शकतात. मी तुमची माफी मागतो सोनियाजी आणि जर शक्य असेल तर मला तुमच्या पायांचा फोटो पाठवा जेणेकरून मी तुमच्या चरणांना स्पर्श करून पाया पडू शकतो. तसेच त्यांनी नरेंद्र मोदी यांना ‘मौत का सौदागर’ म्हणत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मृतदेह मोजण्याचं काम मागितलं आहे.
SONIA GANDHI in 2014 said @narendramodi is MAUT ka SAUDAGAR ..I never knew that she is such a tremendously far sighted visionary and I profusely apologise to u madam Soniaj,and if possible please text ur feet so that I can digitally touch them ???
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 1, 2021
तसेच ते पुढे म्हटले की, तसं तर मी एक साधा भयपट बनवणारा दिग्दर्शक आहे पण मला तुमच्या ‘कोरोनाची तिसरी लाट’ या चित्रपटात एका स्पॉट बॉयचं काम देण्याची विनंती करतो. किंवा मी फक्त एका कारकुनाची नोकरी करायलाही तयार आहे जो मृतदेह मोजायचं काम करेल. कारण मलाही तुमच्यासारखं मृतदेह बघायला आवडतात मग ते कोणत्याही कारणामुळे असु दे.’ असं म्हणत राम यांनी देशातील परिस्थितीसाठी पंतप्रधानांना जबाबदार धरलं आहे.
Saar @narendramodi ji, Am supposedly a decent horror film maker, but I request u to give a spot boy job in ur upcoming horror film,THIRD WAVE ..I also can be just a clerk in the body counting department , because I love bodies as much as u,though for different reasons ?
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 1, 2021




